सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील जवळा जिवाजी येथील ग्रामपंचायत च्या महिला सदस्य नंदा बालासाहेब खरात यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यामुळे सदर ग्रामपंचायत सदस्य यांना पदावरून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 10 कलम 1 / अ नुसार अपात्र ठरल्याचा निर्णय परभणीचे जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी दिला आहे
याबाबतचे वृत्त असे की सेलू तालुक्यातील जवळा शिवाजी येथील येथील ग्रामपंचायत निवडणूक इसवी सन 2015 मध्ये झाली यावेळी प्रभाग क्रमांक दोन मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री करिता राखीव असलेल्या या पदावरून नंदा बालासाहेब खरात या विजयी झाल्या होत्या नंदा खरात यांनी जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक झाल्यापासून सहा महिन्यात सादर करणे गरजेचे होते मात्र सदरील महिला सदस्यांनी विहित मुदतीत आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही त्यामुळे सरपंच अशोक उद्धवराव खरात यांनी ॲड बाळासाहेब रोडगे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे बाळासाहेब यांच्यामार्फत ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 10 /1 अ नुसार अर्ज दाखल केला होता सदर अर्जाच्या सुनावणीदरम्यान अर्जदारांच्या वतीने ऍड बाळासाहेब रोडगे यांनी केले बाळासाहेब रोडगे यांनी केलेला युक्तिवाद गृहीत धरून जिल्हाधिकारी परभणी यांनी अंतिम निर्णय देत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार मुदतीत खरात यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा निर्णय जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी दिला आहे सदर प्रकरणात अर्जदाराच्या वतीने ॲड बाळासाहेब रोडगे यांनी काम पाहिले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें