महाराष्ट्र शिक्षक पॅनेल च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सेवासन्मान सोहळ्यामधे गौरव सेवाभावी संस्था सेलु द्वारा संचलित यासेर उर्दू शाळा सेलु ला आज परभणी जिल्ह्यातील आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
155 शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातुन 40000 पेक्षा जास्त शिक्षकांना शैक्षणिक माहिती देणाऱ्या ग्रुप च्या वतीने तापडिया नाट्यमंदिर औरंगाबाद येथे राज्यस्तरीय सेवासन्मान सोहळा पार पडला यामधे आदर्श शिक्षक,आदर्श शिक्षिका आणि आदर्श शाळा असे पुरस्कार देण्यात आले. यामधे परभणी जिल्ह्यातील सर्वांगसुंदर शाळा म्हणुन यासेर उर्दू प्राथमिक शाळा सेलु ला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदरील पुरस्कार मा.विक्रमजी काळे (शिक्षक आमदार) सतीशजी चव्हाण (पदवीधर शिक्षक आमदार) मा. श्रीकांतजी देशपांडे (शिक्षक आमदार) व विविध शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मा. मधुकरजी काठोळे, मा. कालिदासजी माने, दिलीपजी ढाकणे, मा. संतोषजी ताठे, मा. माधवजी लातूर, मा. राजेशजी सुर्वे आणि तसेच शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवारांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज़ खान आणि शाळेतील इतर शिक्षकांना प्रदान करण्यात आला.
शाळेला आदर्श शाळेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाचालक रहीम खान खैरुल्ला खान यांनी शाळेतील सर्व कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें