औरंगाबाद-भजनसम्राट 'योगेश मोरे'यांचा बालसंस्कार शिबीरामध्ये गजर श्रीहरीचा सुरमय कार्यक्रम संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 21 मई 2019

औरंगाबाद-भजनसम्राट 'योगेश मोरे'यांचा बालसंस्कार शिबीरामध्ये गजर श्रीहरीचा सुरमय कार्यक्रम संपन्न.


योगेश मोरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.20.05.2019

गंगापुर तालुक्यातील स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी  आश्रमाची स्थापना ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पवार यांनी  मेंढीभालगाव येथे केलेली असून,सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे याठिकाणी ज्ञानराज बालसुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून,या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना एक महिन्यासाठी मोफत प्रवेश व भोजनव्यवस्था मोफत आहे.या शिबीरावेळी गंगापुर तालुक्यातील प्रसिद्ध पत्रकार तथा भजनसम्राट योगेश मोरे यांच्या गजरश्रीहरिचा सुरमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी योगेश मोरे यांनी रूप पाहता लोचनी , केशवा माधवा ....तुझ्या नामात रे गोडवा,देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा.....उघड दार देवा आता उघड दार देवा,माझे माहेर पंढरी....आहे भीवरेच्या तीरी,देवाचिये द्वारी उभा क्षण भरी ....तेणे मुक्ती चारी साधियेल्या आदी अभंग,भक्तिगीते व गौळणी सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली.यावेळी साथसंगत मृदंगवर ह.भ.प.अर्जुन महाराज कऱ्हाळे, टाळाची साथ पुरुषोत्तम महाराज पवार,कोरस संगीत विशारद विकास महाराज पवार यांनी केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें