सेलू प्रतिनिधी.
सेलू, : येथील लायन्स इंटरनॅशनल क्लबतर्फे आयोजित तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विविध गटांत आरती जोशी, अपर्णा घांडगे, कमलनयन देशमुख व आदित्य कर्वा हे विजेते ठरले आहेत.
बालाजी मंदिर मंगल कार्यालयात रविवारी (ता.१९ ) १६ वर्षांखालील व १६ वर्षांवरील मुले-मुली अशा दोन गटांत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. एकूण १८० विद्यार्थी, विद्यार्थ्यांनीनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विनोद बोराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, शिवनारायण मालाणी, व्हिजन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, राष्ट्रीय बुद्धीबळ पटू आकाश मुंदडा, चंद्रशेखर मुळावेकर, रतन दायमा, दीपक सराफ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता. पुढील वर्षी खुल्या प्रांगणात स्पर्धा आयोजित केली जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष बोराडे यांनी यावेळी दिली.
विजेत्यांना रोख पारितोषिकासह स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उद्योजक अविनाश बिहाणी, प्राध्यापक ए.डी.कुलकर्णी, राजेंद्र मुळावेकर, रवी मुळावेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक सुयश पटवारी, सूत्रसंचालन भगवान पावडे, तर श्रेयस जाजू यांनी आभार मानले. पंच म्हणून देविदास सोन्नेकर, गणेश माळवे, नागेश कान्हेकर, अभिजित बिलाबे, प्रशांत नाईक यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विवेक मणियार, अश्र्विन रत्नपारखी, सदानंद काजळे, आनंद सोनी, अनुज भुतडा, रामराजे जाजू, श्यामलिंग बजाज, अनुराग जोगदंड, राजाराम जाजू , सुरेंद्र मणियार, राजेंद्र मणियार आदींनी पुढाकार घेतला.
अंतिम निकाल असा :
१६ वर्षांखालील गट:
मुली : प्रथम - अपर्णा घांडगे, द्वितीय - श्रद्धा बोराडे, तृतीय - अंजली डोंबरे, उत्तेजनार्थ - स्नेहा चिलवंत
मुले : प्रथम - आदित्य कर्वा, द्वितीय- राजेश कुंभकर्ण, तृतीय- अमेय कर्वा, उत्तेजनार्थ- आदित्य मुंदडा
१६ वर्षांवरील गट :
मुली : प्रथम - आरती जोशी, द्वितीय- दिया वाधवानी, तृतीय- चंचल परताणी
मुले : प्रथम- कमलनयन देशमुख, द्वितीय- तेजस बोथीकर, तृतीय - वैभव नाईकनवरे
फोटो : सेलू येथील लायन्स इंटरनॅशनल क्लबतर्फे आयोजित तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेतील विजेत्यांना सोबत उपस्थित मान्यवर.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें