पिसाळलेल्या गाईला आवळुन खाजा खुरेशी यांनी वाचविले अनेक नागरिकांचे जिव.
सोनपेठ/मंजूर मूल्लासोनपेठ शहरात दि.19 में रोजी पहाटे ६ वाजेपासून पिसाळलेल्या गाईने हैदोस घातला होता. . .या गाईने 15 ते विस जनानां जबर धडक दिल्याने गंभीरपणे मार लागले असुन यात एक जणास गंभीर जखमी केल्याने त्यास तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काहींना परळी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. सदर गाय पकडण्यासाठी सोनपेठ शहरातील खाजा महेमुद खुरेशी यांनी व दक्ष नागरीकांनी आपले जिव मुठीत घालुन ६ तासांच्या परिश्रमात पिसाळलेल्या गाईला पकडण्यात यश मिळविले सदर गाईला पोलीस स्थानकांच्या परिसरातील लिंबाच्या झाडाला बांधण्यात आले होते यावेळी तालुका पशुधन विकासअधिकारी डॉ.तानाजी भोसले यांच्या संपूर्ण टीमने यात दक्षतेने लक्ष घालून सदर गाईवर दोन दिवस उपचार केले सदर गायचा सोमवार रोजी मृत्यू झाला गाय ही शहरातील कृष्णा सातभाई यांची होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें