सेलू प्रतिनिधी
सेलू: प्रेमप्रकरणातून मुलीच्या घरच्या मंडळींनी युवकाचा खून केल्याची घटना सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे
सोमवारी (ता. २०) उघडकीस आली.आनंद दत्ता गवारे (वय २०) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आनंद दत्ता गवारे हा कामाच्या शोधात सहा मे रोजी मुंबईला गेला होता.
फिर्यादी दत्ता गवारे यांचा चुलतभाऊ आप्पा गवारे यांची मुलगी आनंदसोबत
मुंबईला १३ मे रोजी गावातून निघून गेली होती. हे कळल्यानंतर दत्ता गवारे
यांनी आनंदला फोन करून दोघांनी गावी यायला सांगितले. त्यानुसार दोघे १५ मे रोजी गावात परतले. प्रेमप्रकरणासंदर्भात
दोघांची समजूत काढून प्रकरण मिटविले होते. १७ मे रोजी दुपारी चारच्या
सुमारास मुलीचे वडील आप्पा गवारे,आई चंदाबाई गवारे, सुरेश गवारे, सोनल
सुरेश गवारे, जिजा गवारे, रुख्मिणबाई गवारे (सर्व रा. गुगळी धामणगाव),अक्षय काळे (रा. कोल्हा) यांनी
दत्ता गवारे यांच्या घरासमोर धिंगाणा घालत शिवीगाळ केली. आनंद याने प्रेम केल्यामुळे सुरेश वे अक्षय यांनी
बळजबरीने त्याला मोटारसायकलवर
बसवून कोल्हा (ता. मानवत) येथे घेऊन गेले. या वेळी कुटुंबीयांनी
त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला; परंतु मुलीच्या कुटुंबीयांनी मारहाण करीत
ठार मारण्यात धमकी आनंदला दिली होती. रात्री उशिरापर्यंत आनंद घरी न
आल्याने त्याचे वडील दत्ता गवारे यांनी तो हरविल्याची तक्रार सेलू पोलिसांत
दिली होती. दरम्यान, सोमवारी (ता.२०) आनंदचा सेलू तालुक्यातील तिडी पिंपळगाव शिवारातील विहिरीत मृतदेह सापडला. त्याच्या पाठीत धारदार हत्यार खुपसल्याचेही आढळले. वरील सात व्यक्तींनी जबरदस्ती पळवून नेऊन
आनंदचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची फिर्याद दत्ता गवारे यांनी सेलू पोलिसांत दिली. त्यानुसार सात
जणांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला.उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश एकबोटे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक
संदीपान शेळके तपास करीत आहेत. युवकाच्या हत्या मुळे एकच खळबळ उडाली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें