उन्हाळ्याची तीव्रता व रमजानमुळे बाजारपेठात फळांच्या विक्रीत वाढ. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 21 मई 2019

उन्हाळ्याची तीव्रता व रमजानमुळे बाजारपेठात फळांच्या विक्रीत वाढ.

                                                        सोनपेठ मंजूर मूल्ला / मागील काही वर्षाच्या तुलनेत या वर्षी उन्हाळा जास्त प्रमाण जाणवू  लागत असल्याने व रमजान महिणा सुरू असल्याने बाजारपेठात विविध प्रकारच्या फळांची मागणी वाढली आहे.                          .                                                            सद्यस्थित तापमानात कमालीची वाढ झाल्यामुळे व मुस्लिम बांधवाचे पवित्र रमजान महिना सुरू असल्याने बाजारपेठात मोठ्या प्रमाणात फळे आली आहे.यात टरबुजाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.याच बरोबर खरबुज, आंगुर ,चिंकू, आनानस, संत्री, मोसंबी , नारळपाणी,आदीची मागणी गिऱ्हाईका कडून होत आहे.शहरातील बस्थानक व सार्वजनिक ठिकाणी ज्युस सेंटर ऊसाच्या रसवंत्या लिबू शरबती गाडे जागोजाग लावलेली दिसत आहे. तसेच येथील गोदावरीपात्र कोरडा पडल्याने शहरात पाणी टंचाई भयंकर निर्माण झाली आहे. यामुळे नगरपलिके कडून पंधरा पंधरा दिवस नळाला पाणी येत  नसल्यामुळे पाणी विकत घ्यावे लागत आहे पाणी टंचाई झाल्यामुळे पाणी विक्रीत्याच्या संख्यात वाढ झाली आहे पाणी विक्रीत्या कडून  हजार लिटर पाण्याला दोनशे ते अडीचशे रूपये दर रोज जनतेला मोजावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गरीबाच्या खिशालापण रोज साठ ते शंभर रूपयाची झड लागत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें