सोनपेठ (प्रतिनिधी) येथील जेष्ठ पञकार तथा सामाजीक कार्यकर्ते शिवमल्हार नारायणराव वाघे यांची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास-भारत,या संस्थेच्या सोनपेठ शहराध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस व जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.दिपक भवर यांनी नियुक्ती केली आहे.
वृक्षमित्र शिवमल्हार वाघे हे मागील तीस वर्षा पासुन विविध सामाजीक क्षेञात कार्यरत असुन त्यांच्या कार्याची दखल घेऊन नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्ती बद्दल महेश जाधव (नै.प.सं.व मानव विकास,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष),
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन सामजिक चळवळ सोनपेठ,मराठी पञकार परिषद संलग्न सोनपेठ तालुका पञकार संघ , केमिष्ट अँन्ड ड्रगिस्ट असोशिएशन सोनपेठ, वृत्तपञ विक्रेता संघटना ,सोनपेठ तालुका ग्रंथवाचन चळवळ,साई परिवार, जि.प.शिक्षक मा.संघ, नगरसेवक, प्राध्यापक, डाँक्टर, पञकार,शिक्षक व मिञ परिवाराने अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें