सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील कुंडी येथे वाळूमाफियांनी एका तलाठ्यावर जीवघेणा हल्ला करून लाठ्या काठ्या व दगडाने मारहाण करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून चार जणांसह एका महिलेवर सेलू पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे मात्र गेल्या काही दिवसापासून सेलू आणि परिसरात वाळूमाफियांची दहशत फार मोठ्या प्रमाणात पसरली असून त्यांच्यावर तात्काळ व कायमस्वरुपी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी तलाठी महासंघ आणि तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे
गेल्या काही वर्षापासून सेलू आणि परिसरात वाळूमाफियांची एक लॉबी अस्तित्वात असून त्यांच्यामार्फत कोट्यावधी रुपयाचा व्यवहार होत असतो मात्र वाळूमाफियांच्या लॉबीवर कार्यवाही करण्याची हिम्मत कोणीही दाखवत नाही त्यामुळे सेलू आणि परिसरात वाळूमाफियांची दहशत निर्माण झाली आहे यातूनच सदरील घटना घडली असून कुंडी सध्याचे तलाठी सचिन नवगिरे हे सकाळी 10 30 च्या दरम्यान कुंडी येथे असताना रामेश्वर मोगल परमेश्वर मोगल सुनील मोगल संभा मोगल निर्मलाबाई मोगल या पाच जणांनी सचिन नवगिरे यांना अडून तू आमच्या ट्रॅक्टर का आडवतो असे म्हणून लाठ्या काठ्या व दगडाने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात सचिन नवगिरे यांच्या चेहऱ्याला व दंडाला भरपूर मार लागला असून त्यांच्यावर सेलू उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यात आले असून वरील पाचही वाळू माफिया विरोधात सेलू पोलिसात शासकीय कामात अडथळा यासह जीवघेना हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
याबाबत सेलू तालुका तलाठी संघटनेच्या वतीने सेलू तहसीलदारांना निवेदन दिले असून उद्या दिनांक तीन मे रोजी जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देण्यात येणार आहे या निवेदनामध्ये सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील सर्व तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांची संघटनाही ही सहभागी होणार असून लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आलेले आहे दिलेल्या निवेदनावर तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत काजे जिल्हा सरचिटणीस देवेंद्र सिह चन्देल सेलू तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष एम ए आष्टीकर आदींनी लेखणी बंद आंदोलन करणार असल्याचे सांगितले
दरम्यान झालेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा सेलू आणि परिसरात असलेली वाळूमाफियांची दहशत समोर आली असून त्यांच्यावर कुणाचाच कसा अंकुश नाही याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे सेलू तालुक्यातील या वाळूमाफियांची फार मोठी पोच असून सेलू तील काही पोलिसांना हाताशी धरून रात्री बाराच्या नंतर वाळूची वाहतूक करतात तसेच गरजवंताला पंचवीस ते तीस हजार रुपयाला मोठी टिप्पर भरून वळू चा भाव असून या व्यवहारातून कोट्यावधी रुपयाचा महसूल ची चोरी तर होतेच शिवाय या वाळू माफियांचे फार मोठे रॅकेट अस्तित्वात असून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी गेल्या कित्येक दिवसांपासून ची मागणी आहे अन्यथा आज एका तलाठ्यावर जीवघेणा हल्ला झाला उद्या तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी सारख्या बड्या अधिकाऱ्यावर देखील हल्ला होऊ शकतो तसेच यापूर्वी सेलू येथे तहसीलदार हल्ला झालेला होता मात्र त्याची फारशी गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे आज परत एक वेळ नवगिरे सारख्या तलाठ्यावर ही पाळी आली आहे
सेलू आणि परिसरातील वाळू माफिया वाळूची वाहतूक ई रात्री बाराच्या नंतर पहाटे चार पर्यंत करतात वेगाने ट्रॅक्टर अथवा वाळूने भरलेल्या वाहन चालवून लोकांची झोप मोड करतात या सर्व गोष्टी कडे हेतुपुरस्सरपणे डोळे झाक होत असल्याची चर्चा असून आतातरी संबंधित प्रशासनाने याबाबत दखल घेऊन कार्यवाही करावी तसेच वाळूमाफियांची शिरजोरी बंद करावी अशी मागणी होत आहे.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें