गंगापुर-पिंपळगाव दिवशी येथील शेतकरी आक्रोश आंदोलन यशस्वी मुख्य मागण्या लिखित मान्य. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 13 मई 2019

गंगापुर-पिंपळगाव दिवशी येथील शेतकरी आक्रोश आंदोलन यशस्वी मुख्य मागण्या लिखित मान्य.

योगेश मोरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.13.05.2019

दि 13 मे रोजी शेतकरी कामगार पक्षाचे इंजी. महेश गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव दिवशी ता.गंगापूर नाशिक महामार्गावर शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी अत्यंत शांततेत यशस्वी झाले.
प्रमुख पाच मागण्या बाबत तहसीलदार ,कृषी विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लिखित स्वरूपात पत्र दिल्यामुळे शेतकरी आक्रोश आंदोलन दि 19 मे पर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. यामध्ये कृषी विभागाने डोणगाव मंडळातील वगळण्यात आलेल्या कापूस ,मक्का व इतर पिकाचा विमा दि 25 मे पर्यत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल ,फळबागांचे अनुदान पंचनामे नुसार देण्यात येईल ,दुष्काळी अनुदाना साठी याद्या तलाठी यांच्या कडे देण्यात आल्या आहे.त्यानुसार लाभार्थीना आधार, मोबाइल गट व खाते क्रमांक तलाठी यांच्या कडे तात्काळ जमा करावे .ज्या शेतकऱ्यांना विमा भरणा केंद्रा कडून विमा रक्कम भरली नाही किंवा ज्यांना बोगस पावती मिळाली आहे.त्याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार शेतकर्याच्या मार्फ़त जिल्हाधीकारी यांच्या कडे करण्यात येणार आहे .
चारा छावणी बाबत प्रस्ताव उप विभागीय अधिकारी यांच्या कडे पाठवला आहे. वरझडी येथे शासकीय चारा छावणी सुरु करण्यात येणार आहे.
ज्या वाड्या वस्त्यांना पाणी टंचाई असेल त्या गावांना गट विकास अधिकारी यांना कळविल्या नंतर त्वरित अतिरिक्त टॅंकर सुरु करण्यात येणार आहे.
रायपूर ते डोणगाव रस्त्या बाबत उपविभागीय अभियंता यांनी वर्क ऑर्डर मंजुरीस पाठवली असल्याचे कळविले आहे ,मंजुरी मिळाल्यावर तात्काळ काम सुरु करण्याचे आश्वासने मिळाल्या मुळे सर्वानुमते शेतकरी आक्रोश आंदोलन कृषी सहायक अधिकारी ताजने ,कृषी सहायक गांगुर्डे, ग्रामसेवक शेख ,सा.बा.सहायक अभियंता ,पोलीस निरीक्षक बालक कोळी यांच्या हस्ते स्वीकारून स्थगित करण्यात आले आहे. यावेळी शेतकरी सुनील वावरे ,सुभाष सरोवर,डोंणगावकर,स्वराज्य क्रांती संस्थापक अध्यक्ष अजय साळुंके ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळुंके ,मनसे सर्कल अध्यक्ष योगेश निकम ,विलास काळे ,काँग्रेसचे किरण पानकार,विशाल लांडगे ,शिवसेनेचे संदीप वर्ण,शिवलाल चंडीले,सतीश चांदीले ,शेतकरी कामगार पक्षाचे ता.अध्यक्ष दिगंबर गोटे ,गुजर गुरुजी, प्रवीण थोरात,सरपंच गणेश वावरे ,गोरख वरने, हरीचंद्र बडोगे, राजेंद्र बडोगे, बाबासाहेब वरने,आप्पादेव वावरे,कृष्णा वावरे, धर्मशिंग सुलाने, अजय थोरात, किरीतसिंग जारवाल ,बाबासाहेब जाधव, नंदू साळुंके, संतोष जाधव आधी शेतकरी बांधव मोठया संख्येने सहभागी झाले आहे यावेळी पोलीस जमादार काळे ,आधात व पिंपळगाव पोलीस पाटील यांनी उत्तम बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें