योगेश मोरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.13.05.2019
आज गंगापुर येथील भ्रष्टाचार निर्मुलन समिती सदस्य धनसिंग राजपूत यांनी तहसीलदारांना तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा अद्यापपर्यंत का आला नाही,या विषयी सविस्तर चौकशीची मागणी या निवेदनामार्फत करण्यात आलेली आहे. या निवेदनामध्ये सिध्दनाथ वाडगांव,खोपेश्वर,बोलठान,वडाळी, गाजगाव,खासगाव, देर्डा,पळसगाव,शीरेसायगाव,गोपाळवाडी,शेकटा, रोटस्थळ, वजनापूर,तांदुळवाडी,मालुंजा,कोळघर,उत्तरवाडी, घोडेगाव,शहापूर, कणकोरी,भोयगाव, नारायणपूर,पदमपूर, कोबापूर ही गावे येत असून या महसुल सर्कलमध्ये शेतकऱ्यांनी सण 2018 मध्ये कापूस,मका,तूर,भुईमूग, सोयाबीन, कांदा या खरीप हंगामी पिकांसाठी पीकविमा भरलेला असून तो संपूर्णपणे उध्वस्त झालेला आहे.हजारो शेतकऱ्यांनी आपले सोनं-नाणं गहाण ठेवून तासनतास उपाशीपोटी बँकेत रांगा लावून पीक विमा भरलेला आहे.तसेच सर्व कागदपत्राची पूर्तता शेतकऱ्यांकडून करूनच घेतल्यावर बँकेने स्वीकारलेला असून काही शेतकऱ्यांचे पैसे आले परन्तु, 90 टक्के शेतकऱ्यांचे पैसेच आले नाहीत.या बाबतची चौकशी केली असता एक गंभीर बाब समोर आली ती म्हणजे वरीलप्रमाणे 24 गावे ही शासकीय अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे ही गावे इतर महसूल सर्कलमध्ये गेली असल्यामुळे सदर महसूल सर्कल मधील शेतकऱ्यांना पीक विमा पात्र असूनही लाभापासून वंचीत राहावे लागत आहे.
दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात तर नाहीच परन्तु,त्यांच्या भावनांशी खेळण्याचा गंभीर प्रकार शासकीय अधिकाऱ्यांकडून चालू आहेच,राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या असूनही
शासकिय अधीकारी व कर्मचारी यांची मानसिकता शेतकऱ्यांना मदत करण्याची नाही हे स्पष्ट दिसून येते.या निवेदनात सिध्दनाथ वाडगांव महसूल मंडळातील गावे ही त्याच मंडळात घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करावी न केल्यास दिनांक 22.05.2019 रोजी सर्व मंडळातील शेतकऱ्यांच्या सोबतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील,या वेळी शेतकरी अमोल शिंदे,दीपक जाधव,सलीम शेख,राजाभाऊ खेडकर,साईनाथ पाठे, राजू पाठे,रामसिंग राजपूत,पोपट खोलवाल आदी शेतकरी व भ्रष्टाचार निर्मुलन समिती सदस्य धनसिंग राजपूत उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें