मोटर सायकल आणि चारचाकी वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार तर एक अत्यवस्थ. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 17 मई 2019

मोटर सायकल आणि चारचाकी वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार तर एक अत्यवस्थ.

सेलू प्रतिनिधी दि.17/05/2019.
सेलू : सेलू ते देवगाव फाटा रोडवर  एका दुचाकी वाहनाला चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे मोटरसायकल वरील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा तहसील मधील कर्मचारी गंभीर जखमी अवस्थेत असून जालना व औरंगाबाद येथे संबंधितावर उपचार सुरू असल्याचे कळते

याबाबतचे वृत्त असे की गुरुवार दिनांक 16 मी रोजी रात्री 9.35 च्या दरम्यान सेलू येथील पानपट्टी चालक एकनाथ साडीग्राम रोडगे वय 38 राहणार आत्रे नगर सेलू तसेच सेलू तहसील कार्यालयचे लिपिक जानकीराम चव्हाण वय 45 हे दोघे देवगाव फाट्याहून सेलू कडे येतेवेळी देवगाव फाटा नजीकच एका पुलाजवळ मोटरसायकल क्रमांक एम एच 20 ए डी 53 60 या दुचाकी ने सेलू कडे येथे वेळी एका अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे या मोटरसायकल वरील एकनाथ रोडगे त्याच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्यामुळे रोडगे हा जागीच ठार झाला तर तहसील कार्यालयातील लिपिक जानकीराम चव्हाण यांच्या गुप्तांगावर मार लागल्या कारणाने संबंधित अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत निपचित पडल्यामुळे जाणार्‍या-येणार्‍या काहीजणांनी हा अपघात पाहताच ज्या वाहनाने धडक दिली त्या वाहनचालकाने वाहन घेऊन पसार झाला

मात्र अद्याप पाच मिनिटात चारठाणा पोलीस ठाण्याचे ए एस आय सत्यप्रेम लहाने यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्यांनी त्वरित जखमी अवस्थेत असलेल्या चव्हाण यांना राज्य महामार्ग पोलीस यांची मदत घेऊन मंठा येथे उपचाराकरीता तात्काळ पाठवून दिले तसेच मृत अवस्थेत पडलेल्या रोडगे एकनाथ यांचे प्रेत घेऊन उत्तरीय तपासणीकरिता एका ऑटो मध्ये सदरील प्रेत टाकून सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आले दरम्यान रात्री अकरा वाजता सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी ची व्यवस्था नसल्याकारणाने शुक्रवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 11 वाजता उत्तरीय तपासणी डॉक्टर एस  ए देशमुख वैद्यकीय अधिकारी यांनी केली

दरम्यान रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातातील एकनाथ रोडगे त्याच्या डोक्यावरून चार चाकी वाहन गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला व अपघात एवढा भयानक होता की रोडगे याचा मेंदू नाका-तोंडातून बाहेर पडल्याचे दिसत होते तसेच तहसील कार्यालयातील लिपिक जानकीराम चव्हाण हा देखील अत्यंत गंभीर अवस्थेत जखमी झालेले असून त्यांच्या गुप्तांगाला मार लागल्यामुळे  त्यांना अत्यवस्थ अवस्थेत प्रारंभी जालना येथे उपचाराकरता पाठवण्यात आले मात्र त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याकारणाने तेथून पुढे त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आल्याचे वृत्त आहे

यापूर्वीही अनेक वेळा अपघात होऊन देखील वाहनचालक अत्यंत बेदरकारपणे वाहन चालवतात तसेच वाहना समोरील जे दिवे आहेत ते अत्यंत प्रखर व तेजोमय असल्याकारणाने समोरून येणाऱ्या वाहन चालकाच्या डोळ्यावर एवढ्या प्रखरपणे पोचतात की त्याला समोरचे काहीही ही दिसत नाही त्यामुळे बहुतांश अपघात हे होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे त्यामुळे जिल्ह्यातील परिवहन खाते अथवा त्यांचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत वाहनाना समोरील लावलेले दिवे अत्यंत प्रभावी प्रखर असतात तसेच त्यांना अप्पर टिप्पर करण्याकरिता दिव्या समोरील काच अर्धी काळी  लावणे गरजेचे असते व हॅलोजन तसेच पांढरे व प्रखर फोकस असलेले दिवे जे लावण्यास मनाई असायला पाहिजे या सर्व गोष्टींकडे प्रादेशिक परिवहन खात्याचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे नाहक अनेक जणांचा बळी जात आहे तरी या वाहनधारकांच्या बाबतीत रस्ता वाहतुकीचे नियम आहेत त्या नियमांचे पालन होते की नाही याकडेही प्रादेशिक परिवहन खाते दुर्लक्ष करत आहे या अपघाताच्या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चारठाणा पोलीस ठाण्यात चालू असून तपास ए एस आय सत्यप्रेम लहाने हे करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें