सोनपेठ मंजूर मूल्ला / . देशभरातील दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणुन त्यांना सक्षम करण्यासाठी सक्षम कटिबद्ध असल्याचे सक्षम चे राष्ट्रीय संघटन मंत्री के सुकुमार यांनी सोनपेठ येथे बोलतांना सांगितले. .
समदृष्टी, क्षमता विकास अनुसंधान मंडळ या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सक्षम या संस्थेचे राष्ट्रीय संघटन मंत्री डॉ. के.सुकुमार तसेच प्रांत प्रचारक श्री चंद्रशेखर यांनी सोनपेठ येथे सक्षमच्या वतीने सुरू असलेल्या कामांची माहीती घेतली. तसेच दिव्यांग बंधू व पालकांना एका बैठकीत संबोधित केले. यावेळी बोलतांना सुकुमार यांनी, देशात तीन कोटीहून अधिक दिव्यांग नागरिक असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सक्षमच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनांची माहीती दिली. तसेच सोनपेठ येथे सक्षमच्या वतीने दिव्यांग मदत केंद्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.
दिव्यांगांना सोबत घेतल्याशिवाय राष्ट्राला परम वैभवा पर्यंत नेता येणार नाही. समाजाची देवता म्हणून उपासना करणे हेच संघाचे मुख्य काम असून समाजातील तळागाळातील नागरिकांना सक्षम करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतो. असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रयागराज येथे झालेल्या महानेत्र कुंभा मध्ये हजारो नेत्रहीन व्यक्तींची मोफत सेवा केल्याबद्दल सोनपेठ येथील सोमनाथ कोटूळे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी सक्षमचे डॉ.प्रा. भगवान देशमुख, श्रीराम शिंदे, व्यंकट लांमजने, संयोजक राकेश मेहता, तालुका कार्यवाह ज्ञानेश्वर बोबडे, महेश देशमुख, विजय महाजन, बाळु महाजन, मोहन खोडवे यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहरातील दिव्यांग बंधू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो :- सोनपेठ येथील बैठकीत मार्गदर्शन करतांना राष्ट्रीय संघटन मंत्री के .सुकुमार व चंद्रशेखर

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें