सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील मौ. कुंडी येथे कार्यरत तलाठी सचिन नवगीरे यांच्यावर वाळू तस्करांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते याप्रसंगी तहसीलदार श्री बालाजी शेवाळे व पोलीस निरीक्षक श्री संदिपान शेळके यांना निवेदन देण्यात आले यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष मिलिंद सावंत,तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष मुकुंद आष्टीकर, अमर जोरगेवाड,लसाकामचे तालुका अध्यक्ष राजेश पाटोळे, आबासाहेब लोंढे, सतीश जाधव, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गोविंद चोबी, सचिन कोरडे,कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे श्री देशमुख श्री बन आदि उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें