औरंगाबाद-गंगापूर शहरातील पिण्याच्या पाण्यावर चालणारे वॉशिंग सेंटर व अनधिकृत नळ कनेक्शन त्वरित बंद करा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 3 मई 2019

औरंगाबाद-गंगापूर शहरातील पिण्याच्या पाण्यावर चालणारे वॉशिंग सेंटर व अनधिकृत नळ कनेक्शन त्वरित बंद करा.

योगेश मोरे औरंगाबाद
प्रतिनिधी
दि.02.05.2019

गंगापूर शहरातील पिण्याच्या पाण्यावर चालणारे वाशिंग सेंटर व अनधिकृत नळ कनेक्शन त्वरित बंद करण्याची मागणी तिरंगा ग्रुप प्रतिष्ठान गंगापूर च्या वतीने तहसीलदार गंगापूर यांना निवेदन देऊन करण्यात आली असून, या निवेदनात म्हटले आहे की, गंगापूर शहरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असताना गंगापूरात वॉशिंग सेंटरला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे व नगर परिषदेचे अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी या प्रकाराकडे जाणून बुजून डोळे झाक करताना दिसत आहेत,या मुळे दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.तसेच शहरातील अनेक हॉटेल्स मधेही अवैध नळकनेक्शन जोडलेले आहेत. एकीकडे पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगर परिषदेकडुन केले जाते. आणि दुसरीकडे नगर परिषदेच्या वॉटर फिल्टर मधुन वॉशिंग सेंटरला पाणी पुरवठा केला जातो, हे सर्व अवैध नळकनेक्शन व वॉशिंग सेंटर त्वरित बंद करण्यात यावे.अशी मागणी करण्यात आली आहे,नसता तिरंगा ग्रुप गंगापूर तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला आहे.या निवेदनावर समाजसेवक आनंता कुमावत, संदीप शेळके पाटील,परवेज पठाण, संघरत्न खाजेकर,तान्हाजी हिवाळे,बाबा वाघमारे, किशोर भवार, नासेर शेख,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें