पत्रकारचे अख्खे कुटूंब जाळण्याचा प्रयत्न फसला.जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील थरारक प्रकार.वेळीच जाग आल्याने कुटूंब वाचले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 27 मई 2019

पत्रकारचे अख्खे कुटूंब जाळण्याचा प्रयत्न फसला.जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील थरारक प्रकार.वेळीच जाग आल्याने कुटूंब वाचले.

विशेष प्रतिनिधी प्रतिनिधी/ शमशेर खान.

तालुक्यातील येलदरी येथे एका दैनिकाच्या पत्रकारच्या  घरावर उत्तर रात्री चक्क पेट्रोल टाकून संपूर्ण घरासह कुटुंब जाळून टाकण्याचा असफल  प्रयत्न झाला ही जीवाचा थरकाप उडवणारी घटना 27 मे च्या पहाटे 3 वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान घडली सदर प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यत  गुन्हा दाखल झाला असून पोलिसांची तपास तंत्रणा अज्ञात आरोपीच्या तपासा साठी युद्ध पातळीवर कामाला लागल्याचे समजते
 या प्रकरणी मिळालेल्या या दुर्दैवी घटनेची अधिक माहिती अशी की येलदरी येथील एक दैनिक चे वार्ताहर  प्रशांत मुळी व दुसर्या एक दैनिक चे वार्ताहर प्रवीण मुळी यांचे सर्व कुटुंब  एकत्र  6 जण मध्यरात्री गाढ झोपेत असताना अचानक अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरावर चक्क पेट्रोल टाकून घराचे मुख्य प्रवेशद्वार पेटवून दिले पेट्रोलचा अचानक भडका उडाल्याने घरात झोपलेल्या कुटुंबातील प्रवीण मुळी यांना अचानक जाग आली, त्यांनी तात्काळ कुटुंबातील सर्व सदस्यांना उठून सुरक्षित रूम मध्ये नेले,सदरील आग पाणी टाकून तात्काळ विझवण्यात आली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला, अन्यथा सर्व कुटुंब आगीच्या भक्षस्थानी झाले असते, या घटनेमुळे येलदरी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, सदरील घटना नेमकी कशामुळे करण्यात आली, याचे कारण समजू शकले नाही, परिसरात सध्या अवैध व्यवसाय   प्रचंड प्रमाणात वाढले, अवैध व्यवसायामुळे येलदरी सह ग्रामीण भागात दारुड्या व्यक्तींचा वावर वाढला असून रात्री-बेरात्री दुचाकीवरून जोरात वाहने चालविणार्‍यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे ,सदरील घटना ज्या भागात घडली ,तो भाग येलदरी धरणाचा कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा असून, धरणाला सध्या कुठल्याच प्रकारची सुरक्षा नसल्यामुळे येथील कर्मचारी वसाहतीमध्ये कधीही आणि केव्हाही कोणीही जात असल्यामुळे या भागात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये  प्रचंड दहशत असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे, सदरील प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यत  गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ए एम खान करीत हे करतआहेत,

घटना स्थळी पोलीस यंत्रणा उशिरा दाखल.येलदरी ते जिंतर हे अंतर फक्त 10 ते 11 किमी आहे पण येलदरी येथे उत्तर रात्री घडलेल्या या घटनेचे पोलिसांनी कोणतेच गांभीर्य दाखवले नाही,कारण  पोलीस घटनास्थळी उशिरा पोहचले, कित्येक वेळा फोन करून ही फोन ला प्रतिसाद मिळाला नाही,पोलिसांना एवढ्या मोठ्या घटनेचे कोणतेही गांभीर्य दाखवले नाही, सदरील घटना एवढी भयानक होती की या घटनेत संपूर्ण कुटुंब खाक झाले असते ,मात्र येलदरी येथील या कुटुंबाचे दैव बलवत्तर होते म्हणुन वेळीच जाग विज़वल्याने सर्वांचे प्राण वाचले या घटने प्रकरणी भारतीय दंड संहिता 1860 कलम 436 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें