चार दिवसात गोदावरी नदीपात्रात पाणी सोडा.आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह शिष्टमंडळाने केली विभागीय आयुक्त यांचेकडे मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 2 मई 2019

चार दिवसात गोदावरी नदीपात्रात पाणी सोडा.आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह शिष्टमंडळाने केली विभागीय आयुक्त यांचेकडे मागणी.

भिषण पाणीटंचाई निवरण्यासाठी प्रशासनाला विनंती. 


परभणी (जिल्हा प्रतिनीधी)दि.02/05/2019.
                              अत्यल्प पावसामुळे परभणी जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांबरोबर जनावरांच्या  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे . पाणीटंचाईचा निवारणासाठी चार दिवसात गोदावरी पात्रात व कँनाँलद्वारे पाणी सोडावे अशी मागणी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यासह शिष्टमंडळाने २ मे रोजी औरंगाबाद येथे विभागीय उपायुक्त डॉ विजयकुमार फड यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे
                      यावेळी दिलेल्या निवेदनात असे नमुद केले आहे की,परभणी जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे आज मित्तीस भिषण पाणीटंचाई निर्माण झाली असुन सर्व पाणी साठे तलाव ,नद्या कोरडेठाक पडले आहेत त्यामुळे नागरीकांना बरोबर जनावरांना पाणी मिळणे अवघड झाले आहे.नागरीकांचा दुपार पर्यंत चा वेळ पाणी शोधण्यासाठी जात आहे पाणी टंचाई सर्वाधिक त्रास महिलांना आहे त्यातच  मे जुन हे दोन महिन्याचा कालावधी कसा जाणार हि चिंता ग्रामस्थांना लागली आहे.आगामी महिन्यातील भिषण  पाणीटंचाईच्या निवारणासाठी विभागीय आयुक्त प्रशासनाने प्राधान्याने  चार दिवसात गोदावरी नदीपात्रात पाणी सोडावे तसेच कॅनॉलद्वारे पाणी सोडावे अशी मागणी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यासह शिष्टमंडळाने २ मे रोजी विभागीय महसूल उपायुक्त डॉ.विजयकुमार फड यांच्यासोबत चर्चा करून त्यांना निवेदन दिले या निवेदनावर आमदार बाबाजानी दुर्रानी ,कृउबा सभापती अनिलराव नखाते ,माजी सभापती सुभाष कोल्हे दादासाहेब टेंगसे ,रा.काँ तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे,माजी जि.प.सदस्य चक्रधर उगले,पंस.सभापती राजेभाऊ ढगे,न.प.सदस्य राजू पामे ,पं.स.उपसभापती रमेश तांगडे ,पं.स.सदस्य राधाकिशन डुकरे बाळासाहेब कोल्हे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


*चर्चा मध्ये झाली  प्रभावी मांडणी...*
     औरंगाबाद येथील विभागीय महसुल कार्यालयात विभागीय उपायुक्त डॉ विजकुमार फड याच्यासोबत आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शिष्टमंडळासमवेत परभणी जिल्ह्यातील भिषण पाणीटंचाई संदर्भात सविस्तर चर्चा केली.यावेळी परभणी जिल्ह्यातील तालुका निहाय पाणी टंचाई कृती आराखडा आमलबजावणी साठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा,विहीर अधिग्रहण, टँकर ने पाणी पुरवठा प्रस्ताव हे आठ दिवसात निकाली काढावेत ,परभणी,सोनपेठ ,पाधरी तालुक्याचा  बहुतांश भाग हा गोदावरी नदीपात्रा लगत आहे त्यामुळे गोदावरी नदीपात्रात व कँनाँल द्वारे पाणी सोडले तर बर्याच अंशी पाणी टंचाई चे निवारण होऊ शकते.पाण्याबरोबरच जनावरांच्या चार्याचे नियोजन करावे असे महत्वपूर्ण मुद्यावर आ.बाबाजानी दुर्राणी यांनी  चर्चा केली .यासमस्या बाबत  प्रशासनाकडून तात्काळ दखल घेतली जाईल असे अश्वासन उपायुक्त डॉ विजयकुमार फड यांनी शिष्टमंडळाला दिले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें