सिल्लोड (प्रतिनिधी)दि 02/05/2019.
सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा बुधवार (दिनांक 01)रोजी ध्वजारोहन साजरा करण्यात आला. सराटी येथे सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय इमारत उपलब्ध असताना ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहन साजरा न करता सामाजिक सभागृहासमोर येथील पोलिस पाटील सुंदर गंजीधर गुळवे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले असले तरी ध्वजारोहन स्थळाची पाहणी केल्यास ध्वज पिंपळाच्या फांद्यांमुळे जवळूनही दिसत नाही.
ग्रामपंचायतीने मोकळ्या जागेवर ध्वजारोहन केले नसल्याने झाडांच्या फांद्यांमुळे अवमानही होण्याची शक्यता नाकारता येत नाही करीता सदरील बाब ही गंभीर असुन सदरील प्रकरणाबाबत उपविभागीय अधिकारी पांडुरंग कुळकर्णी यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून सदरील बाब सांगण्यात आली असता तहसिलदारांना चौकशीसाठी पाठविणार असल्याचे सांगितले. सदरील प्रकरणाबाबत उपविभागीय अधिकारी पांडुरंग कुळकर्णी यांच्याकडे संतोष लहाने यांनी चौकशी करण्यात यावी असी मागणी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें