योगेश मोरे, (प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.04.05.2019
महाराष्ट्र सरकारने गंगापूर तालुक्यातील सर्व गावे दुष्काळ ग्रस्त जाहीर करून आज तीन महिने होत आहे ,परंतु लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे प्रस्ताव व मागणी होऊन सुद्धा गंगापूर तालुक्यात एकही शासकीय चारा छावणी सुरु करण्यात आले नाही .२००कोटीच्या वर जलयुक्त शिवाराची कामे झाल्याचा दावा करणाऱ्या तालुक्यात आज 140 टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. यात काही गावांना वाड्या वस्त्यांना 15-20दिवसानंतर सुद्धा पाणी मिळत नाही.पाणी चोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिकांनी लोकप्रतिनिधी व बीडीओ कडे केल्या आहेत .दुष्काळ जाहीर करण्यात आल्या नंतर मागेल त्याला काम देण्याचे आश्वासन दिले होते ते सुद्धा दुष्काळाच्या गरम हवेत विरले कि काय असे वाटत आहे .
गत वर्षीच्या खरीप हंगामातील पिकाचा मोबदला देताना दुजाभाव केला जात आहे त्यात गंगापूर तालुक्यावर अन्याय झाल्याची माहिती समोर आली आहे .
२०१८मध्ये खरिपाचा विमा भरताना कपाशीचा विमा हेक्टरी२१०० रुपयाप्रमाणे भरणा करण्यात आला होता, विमा मंजूर झाल्यास ४२०००रुपये मोबदला मिळणार होता .तालुक्यातील प्रत्येक गावाची आणेवारी ५० पेक्षा कमी असताना दुष्काळ जाहीर होऊनही गंगापूर तालुक्यातील 90% शेतकरी पीक विम्या पासून वंचित आहे .त्यामुळे
डोणगाव व माळीवाडगाव मंडळातील अनेक गावे पीक विम्यातून वघळली कि काय अशी शंका शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाली आहे .
पिंपळगाव, दिवशी, पाचपीरवाडी, वरझडी,रायपूर,किन्नळ,डोनगाव,देर्हळ, बाभूळगाव ,माळीवाडगाव,वैरागड, सनव,दिनवादा ,धामोरी,खडकनारळा आदी गावाचा पीकविमा डावलण्यात आलेला आहे, तसेच इतर गांवाना जो मिळाला आहे त्यांना तो अगदी तुटपुंजा मिळाला आहे.त्यामुळे शेतकऱ्याच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. येणाऱ्या काळात अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.
या दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात दि 6 मे रोजी जिल्हाधीकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे जर दि 23 मे पर्यत योग्य निर्णय न झाल्यास डोणगाव ,माळीवाडगाव मंडळातील शेतकरी मोर्चा किंवा आंदोलन करून आपला हक्क मिळवतील...इंजी.महेश गुजर जिल्हा प्रवक्ता शेतकरी कामगार पक्ष.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें