सेलू प्रतिनिधी,
सेलू तालुक्यातील गुळखंड या गावातील सात वर्षे पायल पाणीटंचाईचा बळी ठरली होती त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने राम पाटील यांच्याकडून आर्थिक सहाय्यता मदत करण्यात आली.
गुळखंड या गावात तीव्र पाणीटंचाईची झळ असल्यामुळे गुळखंडवासी नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहे त्यातच 8 मे रोजी पाणी नसल्याने पाणी आणण्यासाठी आई सविता शंकर आङे सोबत गेलेल्या सात वर्षीय पायल शंकर आङे ही विहिरीत पडली त्यास गावतील युवक शेख अजीस यांनी मोठ्या शिताफीने दोन तास परिश्रम घेऊन बाहेर काढले मात्र पायल पाण्यात गुदमरून तिचा जीव गेला होता,तसेच मृत पायल च्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने शिवसेना जिंतूर सेलू विधानसभा अध्यक्ष राम पाटील यांच्यावतीने दि. 16 मे गुरुवार रोजी गुळखंड या गावात पायलच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना सात्वन देऊन पायलच्या आई सविता शंकर आङे यास रोख दहा हजार रूपयांची आर्थिक रक्कम मदत म्हणून देण्यात आली आहे यावेळेस राम पाटील, गुळखंड चे सरपंच सुभ्रददेवी जवळ,उप सरपंच अनवर पटेल, पोलीस पाटील सलीम पटेल, भास्कर पयघन,शेख अजीस,अतुल डख,पत्रकार रत्नदीप शेजवळ, शेख अलीम,तसेच पायलची आजी सोनाबाई राठोड व नातेवाईक,ग्रामस्थ आदींची, उपस्थिती होती घटना घडल्या नंतर एक ही नेता व अधिकारी फिरकला नाही मात्र शिवसेनेचे राम पाटिल यांनी केलेल्या या परिवारास सात्वन करून आर्थिक मदतीचा हात दिल्यामुळे जिंतूर सेलू तालुक्यात सर्व स्तरातून स्तुती होत आहे.
आमच्या गुळखंड गावांमध्ये पाण्याची तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे एक चिमुकली पायलचा दुर्दैवी बळी गेलेला आहे मात्र सर्व प्रसारमाध्यमांनी योग्य दखल घेतल्यामुळे या बातम्यांची दखल घेत मृत पायल यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे राम खराबे पाटील यांनी त्यांना आर्थिक मदत केल्यामुळे आम्ही त्यांचे आणि प्रसार माध्यमाचे ग्रामपंचायत, गावकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो.=सलीम पटेल. पोलीस पाटील गुळखद ता.सेलू
जिंतूर सेलू विधानसभा क्षेत्र या वर्षी तीव्र पाणीटंचाई झळ शोषित आहे विशेषता वाडी,तांडा, वस्ती, आदि ग्रामीण भागात नागरिक महिला वृद्ध पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहे मात्र जिंतूर सेलू चे सत्ताधारी आमदार जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे तसेच पिण्याच्या पाण्याचा योग्य नियोजन प्रशासनाकडून पण होत नाही म्हणून चिमुकलीचा बळी गेलेला आहे ही मोठी शोकांतिका आहे.=राम पाटील.शिवसेना जिंतूर सेलू विधानसभा प्रमुख

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें