योगेश मोरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.11.04.2019
विद्यार्थ्यांच्या पाच कविता संग्रहाचेही झाले प्रकाशन-
बालसाहित्यिकांची शाळा अशी ओळख असलेल्या गंगापुर तालुक्यातील अंबेलोहल जि.प. प्रशालेत विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले . यात कविसंमेलन , कथाकथन , परिसंवाद याचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये एकाच वेळी विद्यार्थ्यांचे पाच प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आहे. काव्यसुमने , काव्यफुलोरा, ताटवे कवितांचे, काव्यपुष्पे, आणि काव्यांगण , अशी या पाच कवितासंग्रहाची नावे आहेत . आकाशवाणी वर विविध गुणदर्शन सादर करणाऱ्या विदयार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला . या शाळेतील उपक्रमशील साहित्यिक शिक्षक संजय कुलकर्णी यांनी. स्वतः गझलकार व कवी असल्यामुळे त्यांनी मुलांना सतत लिहण्याची प्रेरणा देऊन मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांसाठी सहशालेय उपक्रम म्हणून दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी 'चला बालसाहित्यिक बनुया ' हा उपक्रम शाळेत घेतला .
यात विद्यार्थ्यांना साहित्यिकांची तसेच त्यांच्या साहित्याची ओळख करून दिली जाते . कथा कविता यांच्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचेकडून नवीन साहित्यनिर्मिती करवून घेतली जाते . कविता लेखन कार्यशाळा घेऊन अनेक विद्यार्थी बालसाहित्यिक घडविले . विदयार्थ्यांना सगळ्या शाळेसमोर कथाकथन तसेच कविसंमेलने घेऊन सादरीकरणाची संधी दिली . यातूनच शाळेत 100 पेक्षा जास्त बालसाहित्यिक तयार झाले आहेत. त्यांच विद्यार्थ्यांना साहित्य संमेलनात सादरीकरणाची संधी देण्यात आली.
विद्यार्थिनी कु. रेणुका निचीत या विद्यार्थिनीला कथालेखनात राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला आहे . ऐश्वर्या प्रधान , सानिया बेग या आणि मयुरी नरोटे या तीन विद्यार्थिनींचे वैयक्तिक तसेच इतर सर्व विद्यार्थी यांनी प्रातिनिधिक 221 कवितांचा असे चार कवितासंग्रह लिहले आहे .या साहित्यिक उपक्रमाची दखल घेऊन तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी चारही कवितासंग्रहाचे प्रकाशन 3 मे 2018 राजी केले होते .
सर्व विद्यार्थ्यांनी मिळून 700 पेक्षा जास्त कविता लिहल्या आहेत .
साहित्यसंमेलनात कविसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले . यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर कविता तयार करून सादर केल्या .
आईबद्दल बोलतांना मेरी माँ कवितेत स्वाती प्रधान हिने आईची महती सांगितली.
माँ तू ही मेरी सांसे है
माँ तू ही मेरी धडकन है
प्रीती गवळी या विद्यार्थिनीने
शाळा या कवितेत
वाचणे हा आहे माझा छन्द,
शाळेत गेल्यावर मिळतो आनंद .
अशी आनंददायी शाळा सांगितली.
माझे गाव या कवितेत
गावाबद्दलची संध्या प्रधान हिने पुढीलप्रमाणे कृतज्ञता व्यक्त केली.
आमचे गाव स्वच्छ छान |
आम्ही वाढविणार त्याची शान ||
मयुरी नरोडे हिने
नदी या कवितेत पुढील विचार मांडले
आमच्या शेताशेजारी वाहते गोदावरी,
आम्ही घेऊन जातो मातीच्या घागरी
ऐश्वर्या प्रधान हिने
शिवाजी महाराज या कवितेत
शिवाजी राजांमुळे महाराष्ट्राला मान,
शिवाजी राजे आहेत
स्वराज्याची शान
अशी महाराजांची थोरवी सांगितली
अशा एकाहून एक कवितांनी कविसंमेलन उत्तरोत्तर रंगत गेले .
आई म्हणजे माऊली ,
आई म्हणजे घरावरची सावली ,
आई म्हणजे प्रेमाचा झरा ,
आई म्हणजे कोहिनूर हिरा
संमेलनाध्यक्ष कु. सानिया वसीम बेग हिने आई या कवितेने कविसंमेलनाचा समारोप केला.
यावेळी विदयार्थ्यांचे परिसंवाद आणि कथाकथनही रंगले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापिका श्रीमती ए बी व्याहाळकर यांनी केले . संमेलनाध्यक्ष म्हणून कु सानिया वसीम बेग ही विद्यार्थिनी होती .
प्रमुख पाहुणे म्हणून श्री लोसरवार ,गंगापुर येथील प्रसिद्ध मराठी साहित्यिक,प्रसिध्द व्याख्याते तथा पत्रकार योगेश तू.मोरे ,श्री साळुंके , श्री हिवर्डे श्री औसरमल श्री अमृतकार,श्री पिठले श्री मंडलिक हे उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साहित्यिक शिक्षक संजय कुलकर्णी यांनी तर आभार श्री दिगंबर औसरमल यांनी मानले मुख्याध्यापिका श्रीमती व्याहाळकर यांचे हस्ते बालसाहित्यिकांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमासाठी , श्रीमती भंडारे, श्रीमती कुलकर्णी , श्रीमती प्रधान श्रीमती गदव , श्रीमती निंभोरकर , श्रीमती पाटील , यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें