यासेर उर्दू शाळेत महात्मा फुले जयंती साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 11 अप्रैल 2019

यासेर उर्दू शाळेत महात्मा फुले जयंती साजरी.

सेलू प्रतिनिधी

गौरव सेवाभावी संस्था द्वारा संचलित यासेर उर्दू शाळा सेलु येथे आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक  पठाण जावेद खान फेरोज़ खान हे होते तर प्रमुख अतिथि म्हणुन सय्यद ईमरान हे होते. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट भाषणे केली आणि सर्वांची वाह वाह मिळवली.

शाळेच्या मुख्याध्यापक पठाण जावेद खान यांनी देखील महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य हे अजरामर असल्याचे सांगून आपण देखील उत्तमोत्तम शिक्षण घेण्याचे अवाहन केले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आंतर शालेय चित्रकला स्पर्धा देखील घेण्यात आली यावेळी शाळेतील सर्वच विद्यार्थायन्नी उत्साहाने भाग घेतला.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सय्यद अज़ीम, सय्यद अमन, शेख राहील, शेख साजिद आदींनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें