सोनपेठ (मंजूर मूल्ला) शेळगाव येथील कै. बाजीराव देशमुख विद्यालयाचे शिक्षक वृक्षमिञ तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव यांची पर्यावरण मिञ संघटना ,भारत (पुणे) या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे.
संघटनेचे राष्ट्रीय मार्गदर्शक दिलीप भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे यांनी नियुक्ती केली आहे, महेश जाधव हे मागील अनेक वर्षांपासून स्वतः मोफत रोपवाटीका तयार करून सर्वञ मोफत वाटप करतात, हजारो सीड बाँल तयार करून रस्त्याच्या कडेला, बांधावर लाऊन जिल्ह्यात हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवला आहे, विभागीय स्थरावर केलेल्या पर्यावरण विषयक कार्याची दखल घेऊन पर्यावरण मिञ संघटना-भारत या पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या संस्थेने जाधव यांची नियुक्ती केली आहे.
त्यांच्या नियुक्ती बद्दल वृक्षमिञ वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन सामजिक चळवळ सोनपेठ , तालुका पञकार संघ सोनपेठ, सोनपेठ तालुका वृत्तपञ विक्रेता संघटना,सोनपेठ तालुका ग्रंथवाचन चळवळ, सावली फाऊंडेशन,शिक्षक व मिञ परिवाराने अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें