नागरिकांनी अधिकाऱ्यास वेठीस धरून सेलू चा विद्युत पुरवठा तीन तास बंद पाडला.
सेलू प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे सेलू तालुक्यातील धामणगाव कुंडी व हिस्सी या गावाचा विद्युत पुरवठा खंडित झालेला होता त्यामुळे तीन दिवसापासून या तीनही गावात अंधार होता त्यामुळे चिडून या तीनही गावातील नागरिकांनी सेलू येथील विद्युत पारेषण यांच्या कार्यालयावर एकत्र येऊन अधिकाऱ्याची हुज्जत घालून जोपर्यंत या तीनही गावचा विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत सेलू चा विद्युत पुरवठा खंडित केला त्यामुळे ऐन पाडव्याच्या दिवशी रात्री साडेनऊला विद्युत पुरवठा खंडित झाला तो रात्री साडेबारापर्यंत संपूर्ण सेलू शहर अंधारात होते
ऐन पाडव्याच्या दिवशी रात्री 9:30 च्या दरम्यान धामणगाव कुंडी व हिस्सी या गावातील शे-दीडशे नागरिक एकत्र जमून सेलू येथील विद्युत पारेषण च्या कार्यालयावर जाऊन ठिय्या आंदोलन करण्याच्या मानसिकतेत असताना येथील विद्युत पारेषण अधिकाऱ्यांना वेठीस धरून आमच्या गावचा विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत संपूर्ण सेलू शहरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात यावा अशी मागणी करून सेलू शहरातील विद्युत पुरवठा खंडित करावयास लावला त्यामुळे रात्री 9:30 वाजता सेलू येथील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला त्यामुळे दिवसभराच्या उन्हाच्या तीव्रतेने अगोदरच त्रस्त झालेले नागरिक महिला वयस्कर व्यक्तींना अतिशय त्रास झाला त्यामुळे तब्बल तीन तास रात्री संपूर्ण सेलू शहर अंधारात होते दिवसभराची गर्मा हट आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे संपूर्ण नागरिक घराच्या बाहेर येऊन ओट्यावर बसले होते शेवटी रात्री साडेबारा वाजता या तीनही गावातील विद्युत पुरवठा सुरळीत केल्यानंतर सेलू शहरातील विद्युत पुरवठाही सुरळीत करण्यात आला
संपूर्ण महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली असून सेलू तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे त्यातही केवळ सेलू शहर सोडले तर ग्रामीण भागात दुष्काळाच्या व उन्हाच्या तीव्रतेने नागरिक त्रस्त झाले आहेत त्यात लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम व गर्माहाट अद्याप सुरू झाली नसली तरी विद्युत पारेषण कंपनी कडून मात्र नागरिकांचे हाल करण्यात येत आहेत दिवसातून दहा ते पंधरा वेळेस विद्युत पुरवठा खंडित होतो त्यामुळे महिला व लहान मुलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठा कडे संबंधितांनी तात्काळ लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल
मात्र अशाप्रकारे आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी सेलू शहरातील नागरिकांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे असा सवालही नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें