मोदीच्या हिटलर शाहिला उलथुन टाका-अॅड .प्रकाश आंबेडकर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 7 अप्रैल 2019

मोदीच्या हिटलर शाहिला उलथुन टाका-अॅड .प्रकाश आंबेडकर.

प्रतिनिधी
पाथरी-हिटलरने लोकशाहीच्या माध्यमातुन हुकूमशाही तयार केली ,मोदी सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातुन देशात हुकुमशाही तयार करत आहेत मोदीची हुकुमशाही उलथून पाडण्याचे आवाहन अॅड प्रकाश आंबेडकर यानी केले.

परभणी लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगिर खाँन यांच्या पाथरी येथिल प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर  डाॅ. धर्मराज चव्हान ,गणपत भिसे ,आलमगिर खान ,प्रकाश ऊजागरे , अॅड आशोक पोटभरे आदी मान्यवर उपस्थित होतें.
ते पूढे बोलताना म्हणाले की,शेतक-याचा हमी भाव  देशातील बेरोजगारी ,विकासाची भाषा  कोनीच करत नाही ,भाषा फक्त चोर आणी चौकीदाराचीच सुरु आहे. माझ्या सोसायटी मध्ये चौकीदाराची जागा खाली आहे. चौकीदारी करताल का, असा टोलाही मोदीना लगवला .तुम्ही पंतप्रधान पदावर आहात चौकीदारीची भाषा करने लज्जास्पद वाटतो भाजप, शिवसेना या पक्षानी लोकशाहीचा मजाक मांडलाय यांना त्यांची जागा मताच्या माध्यमातुन दाखवा असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसच्या नेत्यावर एकुन ३४ चौकशा चालू आहेत चौकशिच्या नावाखाली मोदी सरकार विरोधकाना धमकवत आसल्याचंही त्यानी स्पष्ट केलं .वाद विवादातून  संपवण्याची भुमीका हे सरकार घेत असल्याचा आरोप करत हे देशा साठी घातक असल्याचे ते म्हणाले. आता देशात परिवर्तन आवश्यक आसुन वंचीत बहुजन आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्याची विनंती केली.

यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
सुञसंचालन आवडाजी ढवळे, प्रस्ताविक मंचक हरकळ . तर  दिलिप मोरे यानी आभार मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें