औरंगाबाद-गंगापुर तालुक्यातील वाहेगांव येथे हर्षवर्धन जाधव यांना दहा हजाराची लोकवर्गणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 9 अप्रैल 2019

औरंगाबाद-गंगापुर तालुक्यातील वाहेगांव येथे हर्षवर्धन जाधव यांना दहा हजाराची लोकवर्गणी.

योगेश मोरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.09.04.2019

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार हर्षवधन जाधव यांना गंगापूर तालुक्यातील वाहेगांव येथील प्रचार दौऱ्यामध्ये ग्रामस्थांनी दहा हजार रूपयांची लोकवर्गणी देउन पाठींबा दिला.
यासंदर्भात माहिती अशी की, हर्षवर्धन जाधव यांचा सध्या गंगापूर तालुक्यात प्रचार दौरा सुरू असून आज त्यांनी मालुंजा, गंगापूर, वाहेगांवसह इतर गावांमध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेउन प्रचार यंत्रणेची जबाबदारी पेलण्यासाठी मी एकटाच असल्याने तुम्हीच माझ्या प्रचाराची जबाबदारी घेउन मी हाती घेतलेल्या कार्यास बळ द्या असे भावनिक आवाहन केले.
त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत वाहेगांव येथील शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांनी एकत्रितपणे वर्गणी गोळा करून दहा हजार रूपये हर्षवधन जाधव यांच्याकडे सुपूर्द केले व वाहेगांवसह परिसरातील गावांमध्ये प्रचाराची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेत असल्याचे सांगून हर्षवर्धन जाधवांना विश्वास दिला. जाधव यांना गंगापूर तालुक्यात ग्रामीण भागात तन मन धनाने मिळत असलेल्या प्रतिसाद निर्णायक ठरेल असा विश्वास हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें