सेलू /प्रतिनिधि
सेलू शहरातील महेश नगर येथील साई नाट्य मंदिरात ज्येष्ठ नागरिक सेवा संघ तथा पेन्शनर्स असोसिएशन व तहसील कार्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती अभियान समुपदेशन कार्यशाळा जिल्हास्तरीय स्वीप कलापथकाच्या माध्यमातून मतदार राजा जागा हो या कार्यक्रमाचे आयोजन( दी. 8 )सोमवार रोजी करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग महादेव करवले, शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ, विज्ञान तंत्रज्ञान अधिकारी सुनील पोटेकर, उशिक्षणाधिकारी माधव सलगर, प्रा.डॉ. विनायक कोठेकर, डी. व्ही. मुळे, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी जयंत गाढे, बाबूराव दुधगावकर ,सि.टी. नावाडे, डॉ. संजय हरबडे अदिनची उपस्थिती होती.याप्रसंगी कलापथकातील महागायक यज्ञेश्वर लिंबेकर यांनी
पहिले नमन माझे भारत देशाला, दूसरे नमन माझे महाराष्ट्राला आणि तीसरे नमन माझे लोकशाहिला असे म्हणत मतदारानो तुम्हा विनावतो ..करा तुम्ही मतदान जन हो करा तुम्ही मतदान या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर नाट्य कलावंत प्रकाश बारबिंड, नागेश कुलकर्णी, श्रीपाद पुजारी, हणमंत हंबिर यांच्या जमूरे पथनाट्य यातून कसा मतदारास धोका होते हे सांगितले तर किशोर विश्वमित्रे,त्र्यंबक वडसकर यांनी राजा बाजा पथनाट्य करुण मतदान करण्याचे आवहान केले. शाहीर विश्वनाथ झोडपे यांनी शाहीरितून तर मल्हारिकांत देशमुख यांनी लावणी व मोहन आल्हाट यांचे भारूड आणि यज्ञेश्वर लिंबेकर यांच्या सुनो सुनो देश के मतदाताओं मिला है हक तुम्हे सविंधानसे उसे तुम निभाओ या कवालीने कार्यक्रमाचा समारोप झाला. उपस्थित अधिकारी, कर्मचारी, मतदार यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. कलापथकाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या मतदान जागराला मतदारांनी साद घालीत मतदान करण्याचा संकल्प केला. कलापथकामध्ये अरविंद शहाणे,प्रवीण वायकोस, रामप्रसाद अवचार, प्रमेंद्र भावसार, भगवान काळे,यांच्यासह संगीत साथ प्रफुल्ल शहाणे, ज्ञानेश्वर पाथरकर, रामचंद्र ब्रम्हपुरकर, विशाल धानोरकर, आदि कलावंताचा सहभाग होता. सूत्रसंचालन प्रा.सुनील मोडक, सुभाष मोहकरे तर आभार रविंद्र पाठक यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें