शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव,
नगर लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यावर युती व आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांनी आता शिर्डीकडे मोर्चा वळवला आहे. या मतदारसंघाची निवडणूक २९ एप्रिलला होत आहे. तेथील प्रचाराची सांगता येत्या शनिवारी (२७ एप्रिल) सायंकाळी होणार असल्याने राहिलेल्या चार दिवसात शिर्डीचे वातावरण तापवण्याचे नियोजन दोन्हीकडून सुरू आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेनंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभा होणार असल्याने शिर्डी गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आतापर्यंतच्या निवडणुकांतून नगर व शिर्डी मतदारसंघाच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्याने दोन्हीकडे जाहीर सभा, प्रचार फेऱ्यांचा धुराळा उडत असे. पण यंदा प्रथमच या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या तारखांना होत असल्याने राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांना तसेच समर्थकांनाही दोन्हीकडील प्रचार नियोजनाला पुरेसा वेळ मिळाला. युती व काँग्रेस आघाडीसह अन्य पक्षांकडूनही आधी नगर मतदार संघाच्या प्रचार नियोजनाला महत्व दिले गेले व आता येथील मतदान आटोपल्याने शिर्डीचे प्रचार नियोजन हाती घेतले गेले आहे. नगरचे मतदान झाल्यानंतर दक्षिण नगर जिल्ह्यातील युती व आघाडीचे नेते व कार्यकर्ते शिर्डीकडे रवाना होऊन सक्रियही झाले आहेत. पण हाताशी वेळ कमी असल्याने सगळ्यांचीच धावपळ जोरात सुरू आहे.
तिरंगी लढतीची उत्सुकता
शिर्डीमध्ये शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे या दोन प्रमुख पक्षीय उमेदवारांसह अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेही रिंगणात आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखदान व अन्य १६ उमेदवारही रिंगनात.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें