काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अखेर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 25 अप्रैल 2019

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अखेर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.


शिर्डी:
कु.किरण जाधव,


काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विखे-पाटील यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला धक्का बसला असून आता विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस कुणाची वर्णी लावणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेसचे अहमदनगरचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांच्यासाठी राष्ट्रवादीने नगर लोकसभा मतदारसंघाची जागा न सोडल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राधाकृष्ण विखेंविरोधात टीकास्त्र सोडल्यानंतर विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे राधाकृष्ण विखेही भाजपच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. २३ एप्रिलला नगरमध्ये मतदान झाल्यानंतर अखेर विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्याला अशोक चव्हाण यांनी पृष्टी दिली असून राहुल गांधींनी विखे-पाटील यांचा राजीनामा स्वीकारल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विखे-पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें