कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेच्या एक दिवस आधीच कॉंग्रेसअंतर्गत नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या आहेत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 25 अप्रैल 2019

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेच्या एक दिवस आधीच कॉंग्रेसअंतर्गत नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या आहेत.


शिर्डी  :
कु.किरण जाधव,
 जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष करण ससाणे यांनी तडकाफडकी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्ष सोडणार नसल्याची भुमिका त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली असली तरी  माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मोठा दणका मानला जात आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या वक्तव्यांमुळे ससाणे समर्थक नाराज होते. समर्थकांची भावना लक्षात घेऊन राजीनाम्याचा निर्णय घेतला असल्याचे करण ससाणे यांनी सांगितले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. उद्या राहुल गांधी यांची उत्तरेत सभा होत असून यात विखेंसंदर्भात मोठी घोषणा होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, तत्पूर्वीच ससाणे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे थोरात यांना मोठा झटका बसल्याचे चित्र आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें