गंगापुर-सिंधी सिरजगाव परीसरातील गौणखनिजाची अवैध चोरी थांबवण्याची मागणी- सिरजगाव येथील उपसरपंच प्रदीप सोनवणे यांची मागणी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 6 अप्रैल 2019

गंगापुर-सिंधी सिरजगाव परीसरातील गौणखनिजाची अवैध चोरी थांबवण्याची मागणी- सिरजगाव येथील उपसरपंच प्रदीप सोनवणे यांची मागणी .


योगेश मोरे
गंगापूर / प्रतिनिधी
दि.06.04=2019

येथून जवळच असलेल्या सिंधी सिरजगाव,फतुलाबाद,आसेगाव,टोकी नांदेडा,एकलहेरा येथून दिवसराञ लोकसभेच्या काळात गौणखनिज वाळू,मुरुमांची सर्सास अवैधरीत्या चोरी सुरु असून याकडे संबधित महसूल,पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून शासनाचा मोठा महसूल बुडत असल्याने अनेक व्यापारी एजंट या ठिकाणी निर्माण होत आहे.याबाबत सिंधी सिरजगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रदीप सोनवणे यांनी गौणखनिज अनाधिकृतचोरी बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी ,मंडळाधिकारी औरंगाबाद यांना निवेदन दिले आहे. गौणखनिज चोरी करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी उपसरपंच प्रदीप सोनवणे,  पोलीस पाटील संतोष तुपे,   विजय सोनवणे आदी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिक्रीया _   अनेक कित्येक दिवसापासून नदीनाल्या मधील वाळू उपसा सुरु आहे.याकडे प्रशासनाने दुर्लक्ष होत असून गौणखनिज चोरी करणा-यांवर तात्काळ कारवाई करावी _ प्रदीप सोनवणे उपसरपंच सिंधी सिरजगाव.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें