राष्ट्रीय टे.टे.पटु अक्षय कोटलवार यांची दमण व दीव येथे सहाय्यक शारीरिक शिक्षण अधिकारी (क्रीडा) पदी नियुक्ती. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 6 अप्रैल 2019

राष्ट्रीय टे.टे.पटु अक्षय कोटलवार यांची दमण व दीव येथे सहाय्यक शारीरिक शिक्षण अधिकारी (क्रीडा) पदी नियुक्ती.


परभणी  येथील  राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू अक्षय विद्याधर कोटलवार यांची  कर्मचारी निवड आयोग परीक्षेत भारता मधुन  प्रथम क्रमांक मिळाला असुन भारत सरकार मध्ये सहाय्यक शारीरिक शिक्षण अधिकारी (क्रीडा)  पदी केंद्रशासित प्रदेश दमण आणि दीव मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
अक्षय कोटलवार हा परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने राज्य ,आंतरविद्यापीठ , टेबल टेनिस स्पर्धा गाजवल्या आहेत ,  10 पर्यंत शिक्षण मराठवाडा हायस्कूल तर पदवी शिक्षण ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी, बी.पी.एड, एम.पी.एड शिक्षण पुण्यात घेतले आहे.  घरी परीस्थिती सामान्य असुन मेहनत ,चिकाटी, होतकरू खेळाडू नी
केंद्रीय आयोगाच्या परीक्षेत अव्वल स्थान प्राप्त करून  तो आज केद्र शासित प्रदेश दमण दीव मध्ये सहाय्यक शारीरिक शिक्षण अधिकारी (क्रीडा) पदावर रूजू आहे।
त्यांने यशाचे सर्व श्रेय पालक, कौटुंबिक सदस्य आणि मित्र, प्रशिक्षक आणि शिक्षक यांना दिले आहे.
या नियुक्ती बदल परभणी टे.टे. जिल्हाध्यक्ष समशेर वरपुडकर, संतोष सावंत,प्रा. डॉ माधव शेजुळ, राज्य कोषाध्यक्ष रमेश पारे, गणेश माळवे, अनिल बंदेल, बी.बी.भालेराव, डी. पी. पंडीत , चेतन मुक्तावार, आदी अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें