गंगापुर-शेतकऱ्याने सापडलेला बैल केला परत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 5 अप्रैल 2019

गंगापुर-शेतकऱ्याने सापडलेला बैल केला परत.


योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापुर
दि.04.04.2019

भडगाव तालुक्यातील नालबंदी जिल्हा जळगाव येथील  श्री.राजू ताराचंद जाधव हे ऊसतोड कामगार बारामती येथील साखर कारखान्याचे काम बंद झाल्यामुळे ते बारामती ते जळगाव या गावी त्यांच्या बैलाने भरलेला ट्रक औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुर मार्गे जात असताना रात्री दोन वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील मालूंजा फाटा येथील आयडियल इंग्लिश स्कूल च्या समोरील ठिकाणी गाडीतून त्यांचा बैल खाटेसह खाली पडला,यानंतर गाडी निघून गेली.परंतु मालूंजा येथील आप्पासाहेब ढवळे यांनी प्रसंगावधान राखून त्या बैलाला घरी घेऊन गेले व त्यास चारापाणी सुद्धा खाऊ घालून त्या ऊसतोड कामगाराचा शिताफीने शोध घेऊन ऊसतोड कामगाराचा बैल परत दिला.शेतकऱ्यामध्ये अजुनही माणूसकी शिल्लक आहे असे श्री.आप्पासाहेब नामदेव ढवळे यांनी दाखवून दिले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें