बारा दिवसांवर मतदान आले तरी अद्याप पर्यंत प्रचार थंड बस्त्यात.ना प्रचार ना सभा कार्यकर्त्यांच्या घालमेली मुळे संभ्रमावस्था. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 5 अप्रैल 2019

बारा दिवसांवर मतदान आले तरी अद्याप पर्यंत प्रचार थंड बस्त्यात.ना प्रचार ना सभा कार्यकर्त्यांच्या घालमेली मुळे संभ्रमावस्था.


सेलू प्रतिनिधी

संपूर्ण देशात लोकसभा 2019 च्या प्रचाराची रणधुमाळी उडत असताना परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात मात्र अद्यापर्यंत कुठल्याच पक्षाने अथवा त्यांच्या उमेदवाराने प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे बारा दिवसावर मतदान येऊन ठेपली असताना देखील प्रचाराची रणधुमाळी थंड बसण्यातच दिसून येत आहे त्यामुळे प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत सापडले असून कार्यकर्त्यांमध्ये घालमेल सुरू झालेली आहे


परभणी जिल्ह्यात होत असलेल्या लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तारीख 18 एप्रिल आहे मतदाना करिता केवळ बारा दिवस शिल्लक राहिलेले आहेत मात्र सेलू तालुक्यामध्ये अद्याप पर्यंत कुठल्याच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून येत नाही परभणी लोकसभा करिता एकूण 17 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी मुख्यत्वे लढत ही काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सेना भाजपची युती व वंचित बहुजन आघाडी यामध्येच होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे परभणी जिल्हा तसा शिवसेनेच्या पाठीशी आजवर राहिलेला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश विटेकर सारख्या उमेदवाराला उमेदवारी देऊन जातीपातीचे राजकारणाकडे सुरुवातीपासूनच वाटचाल सुरू केलेली आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील राजकारण हे जातीपातीच्या राजकारणाकडे झुकते की काय असा प्रश्न निर्माण झाला असला तरी मुख्यत्वे आघाडीच्या उमेदवाराला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये तीन ते चार उमेदवारांमध्ये विभागली जाणार यात शंकाच नाही कारण दलित आणि मुस्लिम या समाजाचे मतदान एक गठ्ठा न पडता विभागल्या मुळे त्याचा फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला होणार की अन्य कुणाला यावर बरेचसे गणित अवलंबून आहे निवडून येण्याच्या शर्यतीत नसले तरी भाकपचे राजन क्षीरसागर बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार आलमगीर खान हे देखील एक तगडे उमेदवार असल्याचे बोलले जाते मात्र निवडून येणे इतपत ते मजल मारतात का की एखाद्या उमेदवाराला निवडून येण्यापासून रोखू शकतात हेही तेवढेच खरे आहे याशिवाय सपा- बसपाची युती असलेला उमेदवार देखील काही प्रमाणात मतदान खाणार असल्यामुळे हे सर्व मतदान आघाडीच्या उमेदवाराला मिळणार नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांना त्याचा फार मोठा फटका बसणार आहे तसेच आघाडीचे नेते सर्वत्र भाजपच्या विरोधात बोंबा मारत असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात मतदानात घट होणार असली तरी परभणी जिल्ह्यातील सेना-भाजपचा पारंपारिक मतदार तसेच मोदी यांच्याकडे पाहून मतदान करणारा मतदार हा देखील तेवढाच प्रभावी ठरणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे प्रारंभी विटेकर यांच्या बाजूने जाती-पातीचे व गणगोताचे  झुकते माप वाटत असले तरी त्यात म्हणावे एवढा व त्यांच्या फायद्याचा विचार करणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात नाही तसेच जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आमदार असले तरी व जिल्हा परिषद मध्ये सत्ता असली तरी त्याचा फायदा विटेकर यांना होईल असे वाटत नाही कारण त्यांच्यातही गटातटाचे राजकारण सुरू असून काँग्रेस व त्यांची इतर मित्र पक्ष काय भूमिका घेतात यावरही बरेच काही अवलंबून आहे सेलू तालुक्यात आज पर्यंत कुठल्याच पक्षाने प्रचारात आघाडी तर सोडाच अद्याप प्रचार सुरू केलेला नाही त्यामुळे युती व आघाडीचे नेतेदेखील आजपर्यंत गप्प बसून आहेत कदाचित निवडणूक आयोगाच्या अटींमुळे सर्वच उमेदवार हे हातचा ठेवून प्रचार करतात की काय असेच दिसत आहे मात्र आजवरच्या झालेल्या इतर निवडणुका प्रमाणे पार्ट्या भोजनावळी व इतर सर्वच खर्चाला फाटा दिला तर कार्यकर्ते काय करणार त्यामुळे एक प्रकारची संभ्रमावस्था दिसत असून केवळ वैयक्तिक गाठीभेटी यावरच भर दिला जाणार असल्याचे कळते मात्र जिल्ह्यात ज्या काही मोठ्या नेत्यांच्या सभा होणार आहेत त्यानंतर मात्र निवडणुकीचे वातावरण ढवळून निघेल त्यातही सेलू आणि परिसरात उन्हाची तीव्रता वाढलेली असून त्याचादेखील फटका विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रचाराकरिता बसत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें