शहरात रस्त्यारील हातगाडय़ा मुळे वाहतुकीस अडथळा.फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी करण्याची गरज. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 5 अप्रैल 2019

शहरात रस्त्यारील हातगाडय़ा मुळे वाहतुकीस अडथळा.फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी करण्याची गरज.


 *परभणी* : शहरात रस्त्यावर हातगाडे वाहतुकीस अडथळा दूर करावा अशी मागणी होत असल्यामुळे महानगरपालिका अंतर्गत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले परिपत्रकानुसार फेरीवाला धोरणांची मनपाने प्रभावीपणे अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे
मनपाने प्राथमिक यादी तयार केली पाहिजे
शहरातील वाढत्या अतिक्रमणाला आळा घालून त्यांना शिस्त लावण्यासाठी फेरीवाला धोरणानुसार अंमलबजावणी  फेरीवाल्यांचा सर्व्हे करून त्यांना ओळखपत्र देणे व पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा यामध्ये समावेश आहे. त्यानुषंगाने शासन स्तरावर मोबाइल 'अ‍ॅप' विकसित केल्या जात आहे. 'अ‍ॅप'च्या निकषानुसार पुढील प्रक्रिया पार पाडावे लागते शहरातील शिवाजी चौक ते गांधी पार्क व विविध चौका दरम्यान अनधिकृतपणे भररस्त्यावर गाडे उभे केले जात आहेत सदरील गाड्यांमुळे रस्त्यारील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे यामुळे जागेच्या कारणांमुळे छोटे मोठे वाद विवाद होत आहे अश्याच एका कारणाने काल गुजरी बाजारात गुढीपाडवाच्या गाठी चा स्टॉल लावण्याच्या कारणावरून एका सावत्र भावाने जागेच्या वादातून रागाच्या भरात खून झाला होता ! अनेक वेळा वाहतुकीची मोठी कोंडीही होत आहे परंतू असे असतानाही शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी व मनपातील संबंधित अधिकारी सदरील व्यावसायिकांशी तडजोड करुन सदरील गाडेवाल्यांना रस्त्यावर उभे राहण्यास परवानगी देत असल्याची चर्चाही परिसरात केल्या जात आहे  सणासुदीच्या दिवसांत तर सर्वच रस्त्यांवर । हातगाडेचालकांमुळे रहदारीला मोठी अडचण निर्माण होते . यातून अपघात घडण्याची शक्यता आहे . त्यामुळे मनपा प्रशासन व शहर वाहतूक शाखेने सदरील परिसरातील अनधिकृत गाडेवाल्यांना रस्त्यावर उभे राहून वस्तू , फळे ,फुले, भाजीपाला विक्री करणाऱ्या  व्यापाराचे म न पा च्या  वतीने फेरीवाला धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून फेरीवाल्यांना योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून छोट्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या व्यापाराची होणारी हेळसांड दुर करुन न्याय द्यावा या विषयी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटने निवेदनाद्वारे अनेक वेळोवेळी पाठपुरावा केला आहे परंतु मनपाचे अधिकारी कार्यालयाकडून वेळकाढू धोरणामुळे या फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी ठंड़ बस्त्यात दिसुन येत आहे !   सर्वसामान्यांना होणारा नाहक त्रास दुर करावा, अशी मागणीही सर्वसामान्य जनते कड़ुन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें