भारत स्वतंत्र झाला तरी अद्यापही गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याचे कारण.
सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील मौजे राजा या गावात स्वातंत्र्यपूर्व काळापासून अद्यापही पक्का रस्ता नसल्याकारणाने विद्यार्थी महिला तसेच नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे यापूर्वीही अनेक वेळा निवेदने देऊन देखील कुठलाच परिणाम न झाल्याकारणाने येत्या लोकसभा 2019 च्या मतदानावर राजा ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे
सेलू तालुक्यातील मौजे राजा एक चौदाशे लोकसंख्या असलेले गाव असून गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सेलू येथे यावे लागते तसेच रुग्ण पुरुष व महिला यांना उपचाराकरिता सेलू येथे यावे लागते शिवाय गावगाडा चालवण्याकरिता गावातील नागरिकांना बाजारहाट करिता सेलू येथे यावे लागते मात्र राजा या गावापासून सेलू येथे येण्याकरिता कच्चा रस्त्याचा वापर करावा लागतो त्यामुळे पावसाळ्यात व अन्य वेळीही ही सेलू येथे येण्याकरिता पक्का रस्ता नसल्यामुळे वह नही जात नसल्या कारणाने नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे शेजारील ब्राह्मणगाव ते राजा दरम्यान दुधना नदी वाहते त्यामुळे पावसाळ्यात जागोजागी पाणी साचले जाते व त्याचा परिणाम गावातील महिलेला अथवा रुग्णांना सेलू येथे दवाखान्यात आणण्याकरिता त्रास होतो अथवा प्रसूती करिता सेलू येथे आणण्यात येत असलेल्या महिलेला व तिच्या बाळाला जीव गमवावे लागण्याची शक्यता असते भारत देशाला स्वातंत्र्य मिळून एवढे दिवस झाले मात्र अद्यापर्यंत चौदाशे लोकसंख्या असलेल्या राजा या गावापासून सेलू शहराला जाण्याकरिता पक्का रस्ता नाही वास्तविक पाहता महाराष्ट्र शासनाने गावाकरिता विविध सुखसोयी जिल्हा परिषदेच्या मार्फत पुरविल्या जात असतात तसेच राजा हे गाव वालूर सर्कलमध्ये येत असून जिल्हा परिषद मेंबर म्हणून व पंचायत समिती सदस्य म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेले आहेत तसेच तालुक्याचे आमदार देखील विजय भांबळे हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असताना व जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता असतानाही राजा गावाला पक्का रस्ता मिळत नाही ही शरमेची व खेदाची बाब असून अद्याप पर्यंत कुठल्याच नेत्याने आमच्या गावाला रस्ता बनवला नसल्याकारणाने येत्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर राजा गावातील ग्रामस्थांचा बहिष्कार असल्याचे लेखी निवेदन ग्रामस्थांच्यावतीने उपजिल्हाधिकारी सेलू यांना देण्यात आले आहे
तरी शासनाने व प्रशासनाने या बाबीची गंभीरतेने दखल घ्यावी व राजा गावास तात्काळ रस्ता मंजूर करून तयार करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें