सेलू प्रतिनिधी
सेलु :- येथिल सँनरो एज्युकेअर प्रा. लि. प्रस्तुत क्युरिअस कीड्स आयोजित स्फुर्ती समर कँम्प 2019 चे उद्घाटन (ता.24) वार सेमवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, क्युरिअस कीड्स प्रमुख किमी चोंगलाई, शोभा कदम, पालक प्रतिनीधी म्हणुन वसंत बोराडे, अमर ठाकुर व दिनेश मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते. योग, ध्यान, व्यायाम, श्लोक, स्फुर्ती गीत, बडबड गीत, डान्स अकँटीव्हीटी, मनोरंजनात्मक खेळ आदी गोष्टी आजच्या दिवशी घेण्यात आल्या. विद्यार्थी अगदी मन लावुन सर्व गोष्टीचे आकलन करतांना दिसुन आले. विद्यार्थ्यानी पहिल्याच दिवसाचा मनसोक्त आनंद घेतला.
यावेळी बोलतांना शोभा कदम म्हणाल्या की, विद्यार्थ्याने विविध स्पर्धा परिक्षा, गेम्स मध्ये सहभाग नोंदविला पाहिजे. आपली जीत होईल किंवा हार होईल पण त्या मधुन आपणास काही तरी शिकण्यास मिळत. त्याच बरोबर शाळा संपल्या की वेध लागतो तो समर कँम्पचा. आपल्या या कँम्प मध्ये नाविण्यपुर्ण कौशल्य युक्त अँक्टीव्हीटींचा खजीना सहभागी बालकासाठी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे आणखीन आपल्या मित्र मैत्रीणींना सांगा व या कँम्प मध्ये सहभागी होण्यास सांगा.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डिगांबर टाके यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें