योगेश मोरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.10.04.2019
यंदा विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे सुभाष झांबड, तर एमआयएमकडून इम्तियाज जलिल हे तिघे रिंगणात आहेत. त्याचबरोबर अपक्ष म्हणून असलेले हर्षवर्धन जाधव, स्वाभिमानी पक्षातर्फे सुभाष पाटील असे एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत.
१. खासदार चंद्रकांत खैरे मागील वीस वर्षापासून औरंगाबादचे लोकप्रतिनिधी आहेत. अद्याप एकही प्रकल्प पूर्णत्वास नेता आलेला नाही. फक्त जातीय ध्रुवीकरण करून ते दरवेळी निवडून येतात. गेल्या वर्षी मोदी लाटेचा फायदा त्यांना झाला होता. यंदा मोदी लाट ओसरल्याने दिड लाख मते त्यांच्या मतांतून वजा होतील. त्याचबरोबर शिवसेना-भाजपाचा अंतर्गत कलह याचाही फटका खैरेंना जरूर बसेल. पारंपारिक शिवसेनेतील मराठा समाजातील मतेही हर्षवर्धन जाधव आणि सुभाष झांबड यांच्याकडे वळतील. त्याशिवाय नागरिकांचा रोष, एकही काम न केल्याने खैरे फक्त अडीच ते तीन लाखपर्यंत अडकून पडतील.
२. यंदा काँग्रेस महाआघाडीने औरंगाबादेतून अल्पसंख्यांक समाजातील सुभाष झांबड यांना तिकीट दिलेले आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचेच आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारलेले आहे. मात्र, त्यांचा मतदार संघ सिल्लोड असल्याने औरंगाबाद मतदार संघातील मतदारांवर त्यांचा प्रभाव जवळपास नाहीच. त्यामुळे त्यांनी कोणाला पाठींबा दिला काय अन् नाही दिला, त्याचा काहीही परिणाम मतपेटीवर होणार नाही. विधानपरिषदेवर आमदार असताना झांबड यांनी वैजापूर, गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात त्यांनी नदी-नाले खोलीकरण व रूंदीकरण, महिला बचतगट सक्षमीकरणसाठी अनेक कामे केलेली आहेत. त्याचबरोबर मराठा, ओबीसी, मुस्लिम, दलित आणि इतर अल्पसंख्यांक समाजातही सुभाष झांबड यांचा वावर आहे. निवडणूकीच्या चिखलफेकीत एकमेव सुभाष झांबड विकासाच्या मुद्यावर चर्चा करताना दिसताहेत. गेल्यावर्षी नितीन पाटील यांना मोदी लाटेतही साडेतीन लाख मते मिळाली होती. यंदा सुभाष झांबड यांचे प्रयत्न, शिवसेना-भाजपातील अंतर्गत कलहामुळे चार ते साडेचार लाख मते ते घेऊ शकतात.
३. आमदार इम्तियाज जलिल यांनी एकमेव उच्चशिक्षीत उमेदवार म्हणून ओळख निर्माण करण्यात यश मिळविले आहे. मात्र विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंशी असलेले जवळीकता त्यांना नक्कीच भोवू शकते. इम्तियाज जलिल यांना मत म्हणजे शिवसेना आणि भाजपाला मत असा ठाम समज मतदारांचा झालाय. त्यामुळे त्यांचा हक्काचा मुस्लिम समाजही यावेळी काँग्रेसला मतदान करण्याच्या तयारीत आहे. शहरी वगळता ग्रामीणमध्ये इम्तियाज जलिल यांची पकड बिलकुल नाही. त्यामुळे जास्तीत जास्ते चाळीस हजार मते ते घेऊ शकतात, असा अंदाज आहे.
४. अपक्ष उभे असलेले हर्षवर्धन जाधव यांच्या बाजून मराठा समाज ठामपणे उभा आहे. मात्र, आतापर्यंतचा त्यांचा इतिहास पाहता त्यांच्यावर मतदार कितपत विश्वास ठेवतात ते येणारा काळच सांगेल. लहरी स्वभावामुळे इतर कोणताही मतदार त्यांच्याकडे वळणार नाही. त्यामुळे मराठा समाजातील मतांमध्येही विभाजन होईल. स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सुभाष पाटील यांना काहीही दूरदृष्टी नसल्याने पाच-दहा हजारापुढेही त्यांची मजल जाणे अवघड आहे.
*काँग्रेसचा मोठा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही सुभाष झांबड यांच्या प्रचारात हिरारीने येताहेत. त्यातुलनेत शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमांत भाजपाचे नेते, पदाधिकारी अथवा कार्यकर्ते दिसत नाहीत. एकंदरीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलिल आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या लढतीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे सुभाष झांबड यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडेल, अशी दाट शक्यता आहे.*

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें