सेलुत साध्वी प्रज्ञासिंग ठाकुरच्या वक्तव्याचा धिक्कार ◾धरणे अंदोलन, प्रशासनास निवेदन उमेदवारी रद्द करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 22 अप्रैल 2019

सेलुत साध्वी प्रज्ञासिंग ठाकुरच्या वक्तव्याचा धिक्कार ◾धरणे अंदोलन, प्रशासनास निवेदन उमेदवारी रद्द करण्याची मागणी.


सेलु:मुंबई हल्ल्यातील शहिद एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणा-या मालेगाव स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकुर च्या वक्तव्याचा जाहिर धिक्कार करत धरणे अंदोलन सोमवार 22 रोजी महात्मा गांधी पुतळा मोंढा परिसरात करुन प्रशासनास निवेदन देण्यात आले.मागील दोन दिवसापुर्वी महाराष्ट्राचे एटीएस प्रमुख शहिद हेमंत करकरे यांच्या बद्दल 2008 मध्ये महाराष्र्टातील मालेगाव येथे करण्यात आलेल्या बाँम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी व सध्या भोपाळमधुन भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग ठाकुर ने 26 /11 रोजी झालेल्या मुंबई हल्ल्यात आपल्या प्राणाची आहुती देणा-या शहिद एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केले. महाराष्ट्र सह सर्व देशवासियांना शहिद हेमंत करकरे यांच्या प्रति मोठ्या प्रमाणात आदर असुन देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. मात्र एकीकडे भारतीय जनता पक्ष असा लोकांना उमेदवारी देवुन त्यांना पाठबळ देत आहे. शहिद हेमंत करकरे यांना शांतता काळात दिला जाणारा अशोकचक्र सर्वाेच्च शैर्य पुरस्कार मरणोत्तर सन 2009 साली देण्यात आला. एक अतंकवादातील आरोपी देशहिताचे रक्षण करणा-या शहिदा बद्दल अवमानकारक वक्तव्य करत असल्याने तसेच भाजपा अशा लोकांना उमेदवारी देत असल्याने लोकशाही धोक्यात अाली असुन या निचकृतीच्या जाहिर धिक्कार डावे, पुरोगामी व लोकशाहीवादी पक्ष व संघटनेच्या करण्यात आला असुन साध्वी प्रज्ञा सिंह हीची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करत शासनाने शहिद हेमंत करकरे यांचे स्मारक उभारण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असुन यासाठी काँ. रामकृष्ण शेरे, हेमंतराव आडळकर, विनोद तरटे मिलिंद सावंत, रामेश्वर पौळ, उद्धव पौळ,पवन आडळकर जाहेद घौरी, दत्तुसिंग ठाकुर, रघुनाथ बागल, शेख रहिम, महमद इलियास, भारत इंद्रोके, वाल्मिक खुळे, म. बिलाल, विष्णु बागल, परवेज सौदागर, शेख रफिक, गौस लाला, लालुभाई कुरैशी, अ. अजिज, स. मुस्ताक रब्बानी,अनिल वाटुडे,यांच्यासह नागरीकांनी पुढाकार घेतला.
सेलु:शहिद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा जाहिर धिक्कार करत धरणे अंदोलन करुन निवेदन नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांना देतांना काँ. रामकृष्ण  शेरे, हेमंतराव आडळकर, विनोद तरटे, मिलिंद सावंत, दत्तुसिंग ठाकुर, पवन आडळकर ,शेख रहिम, रघुनाथ बागल, महमद इलियास, रामेश्वर पौळ व आदी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें