सेलू प्रतिनिधी
सेलू : येथील नूतन विद्यालयात जागतिक वाचन दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी मनोगत सुरेश हिवाळे म्हणाले की, पुस्तक ही आपली सच्ची मित्र, गुरू,मार्गदर्शक असून पुस्तकांनीच माणसं सुसंस्कृत होतात. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी हे होते. या प्रसंगी करूणा बागले, अशोक लिंबेकर,किशोर कटारे,काशिनाथ पल्लेवाड,सच्चिदानंद डाखोरे, लक्ष्मण वांगे यांच्यासह वासंतीक शिबीरात सहभागी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. पुढे आपल्या भाषणात सुरेश हिवाळे म्हणाले की, पुस्तक वाचनाने आपल्यातील उपजत गुणांच्या विकासाला चालना मिळते. आपले मनोबल उंचावते. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्यामुळेच शून्यातून विश्व निर्माण करण्याच सामर्थ्य आपल्यात वृध्दंगत करणारी पुस्तकं आपण वाचायला हवीत. सुञसंचालन आणि आभार प्रदर्शन विरेश कडगे यांनी केली.
सेलू : येथील नूतन विद्यालयाच्या ग्रंथालयात जागतिक वाचन दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी अनिल कुलकर्णी, सुरेश हिवाळे,सच्चिदानंद डाखोरे,विरेश कडगे,करूणा बागले आणि विद्यार्थी.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें