वाढदिवसाचा खर्चास फाटा देऊन दोन कुटुंबाचा लग्नाचा खर्च उचलणार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 11 अप्रैल 2019

वाढदिवसाचा खर्चास फाटा देऊन दोन कुटुंबाचा लग्नाचा खर्च उचलणार.

राम पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यकर्त्यांच्या निर्णय.



सेलू प्रतिनीधी


शिवसेनेचे जिल्हापरिषद गट नेते तथा विधानसभा प्रमुख राम पाटील यांनी त्यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी निर्णय घेऊन सेलू तालुक्यातील गरीब कुटुंबाचा लग्नाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज 12 एप्रिल रोजी मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.

नेहमी राजकारणाबरोबर सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या राम पाटील यांचा वाढदिवस 12 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो मात्र यावर्षी असलेली दुष्काळी परिस्थिती मतदार संघात वाढलेल्या शेतकरी आत्महत्या यामुळे त्यांनी आपला वाढदिवस कोणतेही प्रकारच्या जाहिराती,बॅनर, हारतुरे,भेटवस्तू आदींवर खर्च टाळण्याचे आव्हान शिवसैनिक व त्यांच्या चाहत्यांना  केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत वाढदिवसावर होणारा खर्च गरीब कुटुंबातील सेलू तालुक्यातील कानड व हिस्सी येथे लग्न जमलेल्या मुलीचा लग्नाला मदत करण्यात येणार आहे तसेच सेलू व जिंतूर मतदार संघात जवळपास 10 ठिकाणी थंड पिण्याचा पाण्याचा पाणपोई सुरू करण्यात येणार आहेत.तसेच विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक व हितचिंतकांनी वाढदिवसाचा कार्यक्रमावर विनाकारण खर्च न करता समाजउपयोगी कार्यक्रम राबवावेत असे आवाहन राम पाटील यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें