योगेश मोरे प्रतिनिधी
गंगापुर
दि.06.04.2019
गंगापुर तालुक्यातील जामगाव येथील सह्याद्री इंग्लिश शाळेचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.कार्यक्रमाची सुरुवात सुमधुर स्वागत गीताने झाली. आप्पासाहेब माने, विनोद पाटील काळे,सुभाष माने,गंगापुर येथील प्रसिद्ध मराठी साहित्यिक योगेश तू.मोरे,गणेश पंडित, देविदास वाघ, नंदू सद्गुरे,दत्ता सांळुके , अंकुश बोडखे ,गणेश राऊत , बाबासाहेब चव्हाण ,भाऊसाहेब शेळके ,योगेश लोखंडे शाळेचे अध्यक्ष संपत रोडगे
या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.मुख्याध्यापक अविनाश माघाडे यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. प्रसंगी विद्यार्थ्यांनी भारतीय जीवनावर आधारित तसेच आत्महत्या अशा विविध विषयांवर नाटिका सादर केली.
शिक्षणाचे महत्त्व ,बेरोजगारी, विद्यार्थ्यांनी सुमधुर गीत गायनाने पालकांना मंत्रमुग्ध केले.तसेच बहारदार नृत्याविष्कार सादर केला.प्रसंगी पालकांचा उत्साह आणि प्रतिसाद अतिशय चांगला होता.कार्यक्रमा नंतर विद्यार्थी सादरीकरणाची पंचक्रोशीतील पालकांमध्ये चर्चा होती.सूत्रसंचालन इयत्ता तिसरी चे विद्यार्थी कार्तिक सरोदे व महेश नेटके यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अविनाश माघाडे,सोमनाथ काळे, शिक्षक अशोक पारखे, विशाल माने,शिक्षिका योगिता ठोंबरे, आरती ठवाळ, प्रीती कोल्हेकर, प्राजक्ता वाडे, शीतल बोरुडे, गोळे जी. एन, कांता साळवे यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें