औरंगाबाद-शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 9 अप्रैल 2019

औरंगाबाद-शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन.

योगेश मोरे(प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.09.04.2019

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा पार्श्वभूमीवर ज्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला ते कन्नडचे आमदार हर्षवर्धन रायभान जाधव यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीत खैरेंच्या विरोधात दंड थोपटुन रणशिंग फुंकले आहे, शनिवारी रोजी हजारोच्या समर्थकांच्या साक्षीने औरंगाबाद येथील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला गुलमंडी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करत जाहीर सभा घेत खैरेंचा समाचार घेतला असता, शहरातील जोरदार वातावरणाच्या नतंर गंगापुर तालुक्यातील श्रीक्षेत्र कायगाव येथून प्रचाराचा नारळ वाढवत ४ एप्रिल रोजी गंगापूर तालुक्याच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. तसेच जाहीर सभाचे आयोजन करण्यात आले होते, अठरापगड जातीतील बहुजन समाजाला सोबत घेऊन शिवस्वराज्य निर्माण करण्यात येतो हेतूने हर्षवर्धन जाधव यांनी महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये परिवर्तन यात्रा च्या निमित्ताने तरुणांमध्ये जनजागृती करत शिव स्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली असून याच पक्षाच्या माध्यमातून ते औरंगाबाद लोकसभेच्या या रणसंग्रामात विजय पताका फडकावण्यासाठी सज्ज झाले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें