. अवैध रित्य वाळु उपसा करण्या-या वर सोनपेठ प्रशासनाचे दुर्लक्ष ? . सोनपेठ मंजूर मूल्ला/ तालुक्यात ट्रक्टरची वाढलेली संख्या पाहता हे ट्रॅक्टर केवळ शेतीकामांसाठीच वापरले जात असतील हे न पटण्यासारखे आहे.
वाळू वाहतुकीसाठी ट्रॅक्टरची गरज मोठ्या प्रमाणात भासत असल्यानेच येथे ट्रक्टरची संख्या वाढल्याचे दिसत आहे. सोनपेठ शहरात काही अंतारावरच वाणीसंगम व तालुक्यातील ईतर नदीपत्रातून दिवस रात्र अवैध वाळू वाहतुकीसाठी ट्रॅक्टर अधिक सोईस्कर ठरत आहे. तसेच ट्रॅक्टर चुकून पकडले गेले तर त्यांना बसणारा दंडही टिपरच्या तुलनेत कमी असतो, अशावेळी हा आर्थिक दृष्टिकोन ठेवून देखील ट्रॅक्टरचा उपयोग वाळू वाहतुकीसाठी केला जात असतो. वाळू नदीपात्रातुन ट्रॅक्टरच्या मदतीने निर्धारित ठिकाणी आणल्यानंतर ही वाळू टिपरमध्ये भरून ईतर जिल्ह्यातील शहरांत पाठवली जाते यात लाखो ची उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे.वाळू व्यवसायातील अनेक लोकांचा संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात, काहींचा तर घरीही राबता राहत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. यातून हे ‘हितसंबंध’ किती खोलवर गेले आहेत हे लक्षात येते. व्यावसायिकांचे काही माहीतगारही कार्यरत असतात, जेणेकरून कुणी बाहेरचा अधिकारी येणार असेल किंवा कारवाई करण्याची कुणकूण लागली तर वेळीच सावध करण्यासाठी हे माहीतगार कार्यरत राहतात. तसेच हा व्यवसाय बिनदिक्कत करायचा असेल, तर संबंधित असलेल्या कार्यालयास अवैध रित्य वाळू उपसा करण्या-या ट्रक्टरचालकानां काही न काही चिरीमिरी महिन्याकाठी द्यावी लागत असल्याचे सांगितले जाते.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे भरारी पथक स्थापन केले आहे. मात्र गेल्या वर्षभरातील या पथकाची कामगिरी पाहता हे केवळ शोभेचे पथक असल्याचे दिसून येते. राजरोसपणे वाळू उपसा करून वाहतूक सुरू असताना पथकाला मात्र ही वाहने दिसत नाहीत. दररोज शेकडो वाहने वाळू वाहतूक करत असताना या पथकाने वर्षभरात केवळ काहीच वाहनांवर कारवाई केली आहे. दुसरीकडे पोलिसांचे रात्रीचे गस्तीपथकही फिरत असताना त्यांनी देखील या वाहनांना अडवून त्या वहानांवर कडक कार्यवाही करावी पाहिजे पण तशी ही कार्यवाही होत नसल्याची जनतेतुन बोलले जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें