सेलु तालुक्याती रायपुर येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 25 अप्रैल 2019

सेलु तालुक्याती रायपुर येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या.


सेलू प्रतिनिधी.


सेलू : तालुक्यातील रायपूर येथील शेतकरी धोंडीराम यादवराव गाडेकर वय (४३) यांनी गुरुवार रोजी  आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोनच महिण्यांपुर्वी त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते.

त्यांच्या कडे देना बॅक सेलू येथील पिक कर्ज ३ लाख तर महिंद्रा फायनान्स चे एक लाख रू व सोसायटीचे पंचवीस हजार रू कर्ज होते. त्यांच्या कडील असलेली सहा एक्कर शेतीतील अत्यंत कमी उत्पन्न, घेतलेले कर्ज त्यातच मुलीच्या लग्नातील खर्च, सततची ना पिकणारी शेती, कर्जाला कंटाळून , आणि दुष्काळ यामुळे अखेर त्यांनी गुरुवार रोजी  आपली जीवन यात्रा संपवली.

या घटनेमुळे सेलू तालुक्यासह रायपूर  परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी,दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें