वालुर दि.01/04/2019.
सेलु तालुक्यातील वालुर येथे मागील दोन महिण्यापासुन सार्वजनिक नळाला पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने गावातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठि भटकंती करावी लागत असुन या प्रकरणी ग्रामपंचायत वालुरला वेळोवेळी तोंडि तक्रार करुन देखिल दुर्लक्ष केले जात आहे..
वालुर येथील काहि भागात 15 दिवसाला तर काहि भागात पाणीच येत नसुल्याने वालुर येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठि भटकंती करावी लागत आहे किंवा विकत पाणी घेण्याची वेळ आलेली असुन ग्रामपंचायत या संबधी कोनतेहि उपाय योजना करित नसुन जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी आधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन वालुर येथील पाणी पुरवठा सुरळीत करावा आशी मागणी इत्तेहाद ग्रुपच्या वतिने आज दि.01/04/2019 रोजी एका अर्जा द्वारे करण्यात आली आहे निवेदनावर अनवर पठान.शे.अफज़ल.सत्तार पठान.शे.कलिम.समीर पठान आदिंच्या स्वाक्षर्या आहेत..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें