सेलू प्रतिनिधी
सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीकरिता दाखल झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करून घेऊन तिच्या वरती उपचार करण्याकरिता झालेल्या दिरंगाईमुळे व ऐन वेळी परभणी येथील रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रसूती करीता गेलेल्या महिलेला मुलगी झाली मात्र तिच्या वरती पुरेसे व आवश्यक उपचार न झाल्यामुळे ती दगावली असून तिच्या मृत्यू करिता जबाबदार असणाऱ्या सेलू येथील डॉक्टर व इतर संबंधितावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रसूतीस गेलेल्या व दगावलेल्या मुलीच्या आईने जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे
याबाबत चे सविस्तर वृत्त असे की सेलू येथील राजीव गांधी नगर मधील महिला गंगा गणेश डमरे ही 19 मार्च रोजी प्रसूतीकरिता सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात गेली असता येथील डॉक्टर व इतरांनी कुठलेच सहकार्य न करता प्रसूतीकरिता दाखल करून घेण्यासाठी उशीर केला तसेच रात्री अकरा वाजता तुम्हाला इथे इलाज होत नाही परभणी येथील दवाखान्यात जावे लागणार आहे असे म्हणून परभणी येथील दवाखान्यात रेफर केले मात्र सदरील महिलेला परभणी येथे जाण्यासाठी 108 नंबरची रुग्णवाहिका देखील वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही त्यामुळे परभणी येथील दवाखान्यात जाण्याकरिता जवळपास दोन ते अडीच तासाचा विलंब झाला तसेच परभणी येथील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिची प्रसूती झाली मात्र इलाज करण्याकरिता झालेल्या विलंबामुळे पुरेसा व आवश्यक तो इलाज करू न शकल्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्या लहानग्या मुलीचा मृत्यू झाला
मात्र या सर्व प्रकरणात सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व संबंधित सर्व कर्मचारी वर्ग हाच जबाबदार असून माझ्या मुलीच्या मृत्यू कारणीभूत आहेत त्यामुळे या सर्वावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी जिल्हा शल्य चिकित्सक परभणी तसेच जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे गंगा गणेश डमरे या महिलेने केली असून सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात कुठल्याच प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालय बंद करावे अथवा पुरेशा व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ज्यामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाला ती वेळ इतर कुठल्याही महिलेवर येऊ नये याबाबतची काळजी संबंधित प्रशासनाने घ्यावी अशीही मागणी सदरील महिलेने केलेली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें