परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९.मंगळवारी १८ उमेदवारांनी दाखल केले २२ नामनिर्देशनपत्र. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 26 मार्च 2019

परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९.मंगळवारी १८ उमेदवारांनी दाखल केले २२ नामनिर्देशनपत्र.

परभणी, दि. २६ :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ च्‍या अनुषंगाने १७- परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दि.२६ मार्च २०१९ रोजी १८ उमेदवारांनी २२ नामनिर्देशनपत्र दाखल केले असून त्‍याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्‍या उमेदवारांमध्‍ये डॉ.अप्‍पासाहेब ओंकार कदम (स्‍वतंत्र भारत पक्ष), राजेश उत्तमराव विटेकर (राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) २ नामनिर्देशनपत्र, डॉ.वैजनाथ सिताराम फड व डॉ.शामसुंदर पंढरीनाथ वाघमारे (बहुजन समाज पार्टी), हरिश्‍चंद्र दत्‍तू पाटील (संघर्ष सेना), संतोष गोविंद राठोड (भारतीय बहुजन क्रांती दल), सखाराम ग्‍यानबा बोबडे (अपक्ष व बहुजन आझाद पार्टी) २ नामनिर्देशनपत्र, दादाराव गणपतराव पंडीत (भारिप बहुजन महासंघ), उत्‍तमराव पांडुरंगराव राठोड (बहुजन मुक्‍ती पार्टी), बालासाहेब शेषराव हारकळ (अपक्ष), उद्धव रामभाऊ पवार (अपक्ष), राजेंद्र दामोधर पगारे (अपक्ष), संजय (बंडू) हरिभाऊ जाधव (शिवसेना) ३ नामनिर्देशनपत्र, डॉ.धर्मराज ज्ञानोबा चव्‍हाण (वंचित बहुजन आघाडी), सिद्धेश्‍वर पंडीतराव पवार (अपक्ष), किशोर नामदेव गवारे (भारतीय प्रजा सुराज्‍य पक्ष), सुभाष अशोक अंभोरे (आंबेडकर नॅशनल कॉंग्रेस), संजय रामराव परळीकर (अपक्ष) इत्‍यादी उमेदवारांनी मंगळवार दि.२६ मार्च २०१९ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल केले. आत्‍तापर्यंत १७-परभणी लोकसभा मतदार संघ निवडणूकीमध्‍ये २७ उमेदवारांनी ३८ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, १७-परभणी लोकसभा मतदार संघ अंतर्गत ९६-परभणी विधानसभा मतदार संघ यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें