(अजय बाेराडे )
सिल्लाेड येथुन जवळच असलेल्या जळकी घाट येथे सध्या पाणी टंचाई जाणवत असुन , पाणी पुरवठा चांगला व्हावा व पुरेसा व्हावा करिता गावकरी लोकवर्गणी करुन तेथुन जवळच असलेल्या धामणी येथिल धरणात चर व भुडकी खोदायला तयार आहेत. त्याकरिता तेथिल ग्रामस्तानी संभाजी ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष काकासाहेब मोरे, जिल्हा समन्वयक नारायण फाळके यांच्या पुढाकाराने तहसिलदाराना निवेदन देऊन सबंधीत मागणी पुर्ण करावी जर 25 मार्च पर्यन्त पुर्ण झाली नाहित तर आमरण उपोशन करन्याचा ईशारा देन्यात आला आहेत.
येथे दहा ते बारा वर्षापुर्वी केळगावहुन विहिर खोदुन जलवाहिनी आलेली होती .परंतु ती कुच कामी ठरली. तिचा वापर होऊ शकत नाहित. तसेच बोजगाव व जळकी घाट या दोन गावाची सयुक्त ग्रामपंचायत असल्याने जास्तित जास्त पाणी बोजगाव जाते तर आम्हास न्याय मिळत नसल्याचे येथिल ग्रामस्था रावसाहेब कावले,
देविदास कावले, अजय कावले, यानी सांगीतले.
सध्या थोड्याफार प्रमाणात धामणी धरण परिसरात एक विहिर असुन तिचे पानी जळकी गावालगत असलेल्या वीहिरित टाकुन तेथुन ग्रामस्थ शेन्दुन नेतात परंतु ते पुरेसे नसते. गुरा -ढोराना, जनावरानाही पिन्यास पाणी मिळत नसल्याची प्रतिक्रिया येथुन आली.
या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री.शेजुळ म्हणाले की, पाणी पुरवठा अधिकार्याकडे दिला असुन सोमवार पर्यन्त जळकी घाट गावाला पाणी पुरवठा होईल म्हणुन सांगीतले.
पाणी पुरवठा अधिकारी श्री. जिवरग म्हणाले की ,सोमवारी ट्यान्करद्वारे पाणी पुरवठा होईल.
या ग्रामस्तान्च्या मागणिचा विचार करूण अधिकारी वर्गास सुचना देऊन लवकरात कवकर पाणी कसे पोहचेल यासाठी प्रयत्न करुत.
माजी सभापति अशोकदादा गरुड.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें