सिल्लोड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाची प्रशासकीय यंत्रणा तयारीस लागली असून, सिल्लोड तालुक्यातील निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले.
ठळक मुद्दे
सिल्लोड : प्रशासकीय तयारी; गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा, व कडक फौजदारी कार्यवाही करणार - श्री पांडुरंग कुलकर्णी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे प्रतिपादन
सिल्लोड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाची प्रशासकीय यंत्रणा तयारीस लागली असून, सिल्लोड तालुक्यातील निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. उपजिल्हाधिकारी श्री एस पी सावरगावकर,
उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री पांडुरंग कुलकर्णी, तहसीलदार सिल्लोड श्री रामेश्वर गोरे, तहसीलदार सोयगाव श्री प्रवीण पांडे, यांच्या उपस्थितीत क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्यक्ष निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या प्रशिक्षण वर्गास विनापरवानगी गैरहजर असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्याना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
समाधानकारक खुलासा सादर न केल्यास प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने जारी केल्या आहेत. याप्रसंगी नायब तहसीलदार संजय सोनवणे, प्रभू गवळी, विनोद करमनकर, किरण कुलकर्णी, विठ्ठल जाधव, तालुका स्तरीय विविध अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळच्या निवडणुकीत मतदान प्रक्रि या राबवताना व्हीव्हीपॅट नवीन मशीन समाविष्ट करण्यात आले असून, यामुळे मतदाराला मतदानाची खात्री पटणार आहे.
या मशीनसंदर्भात कर्मचा-यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष मशीन हाताळून प्रात्यक्षिकाद्वारे मशीनची कार्यप्रणाली समजून देण्यात आली.
मतदारांबरोबरच कर्मचा-यांनाही या नव्या मशीनचे आकर्षण वाटले.
तसेच मतदान यंत्रे हाताळणीचा मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांना अधिक चांगला सराव व्हावा यासाठी शासकीय तंत्र प्रशाळा, आय टी आय परिसर सिल्लोड येथे बॅचेस निहाय प्रशिक्षणासाठी दिनांक १९ मार्च ते ३ एप्रिल या दरम्यान दररोज सकाळी १० ते ६ या वेळेत नियोजन करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें